Mumbai Local Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबई लोकलच्या ताफ्यात दाखल होणार नवीन ट्रेन, कधीपासून धावणार? तारीख आली समोर

Mumbai New Local Train: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई लोकलचा चेहरामोहरा बदलणार आहे. मुंबई लोकलच्या ताफ्यात नव्या लोकल येणार आहेत. या लोकल कधीपासून धावणार? घ्या जाणून...

Priya More

मुंबईत आज लोकलचा भयंकर अपघात झाला. मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलला अपघात झाला. यावेळी तोल जाऊन १३ प्रवासी रेल्वे रूळावर पडले. यामधील ४ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहे. या लोकल अपघातामुळे मुंबई हादरली. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा निर्णय घेतला. मुंबई लोकलचा चेहरामोहरा बदलणार आहे. कारण लोकलच्या डब्याचे संपूर्ण डिझाइन बदलण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. ही नवी लोकल कधी मुंबईकरांच्या सेवेत येणार? त्याचे काय वैशिष्ट्य असणार आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत...

रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची आज इंटीग्रल कोच फॅक्ट्रीच्या टीमसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये मुंबईत धावणाऱ्या नॉन-एसी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होण्याशी संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये मुंबईतील ईएमयू सर्बर्बन लोकलमध्ये बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मुंबई लोकलच्या ताफ्यात येणारी नवी ट्रेन नोव्हेंबर २०२५ रोजी तयार होणार आहे. ही नवीन लोकल जानेवारी २०२६ रोजी रुळांवर धावेल आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज होईल.

या नव्या लोकलच्या डब्यांमध्ये तीन महत्वाचे बदल केले जाणार आहेत. या लोकलला स्वयंचलित दरवाजे असणार आहेत. कोच रुफ माऊंटेड व्हेन्टीलेशन युनिट असणार आहे. यामुळे लोकलच्या डब्यात वरच्या भागातून हवा येईल. तसंच एसी लोकलमध्ये ज्याप्रमाणे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते तसंच या नव्या लोकलमधून देखील एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येणार आहे. यासाठी या लोकलमध्ये व्हेस्टीब्युल गँगवे असणार आहे.

दरम्यान, आज सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलला अपघात झाला. यावेळी धावत्या लोकलमधून अनेक प्रवासी रेल्वे रूळावर पडले. या अपघातामध्ये फक्त पुरूषच नाही तर महिला देखील जखमी झाल्या. कुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर कुणाचा हात तर कुणाचा पाय तुटला. या सर्व जखमींवर सध्या कळव्यातील सरकारी रुग्णलाय आणि ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सूरू आहेत. या अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT