Eknath Shinde - Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde - Raj Thackeray Meeting : शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको, राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

Nashik News : मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावू नका असे सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले.

आज सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  (Latest Marathi News)

राज्यात अद्याप चांगल्या पावसाला सुरूवात झालेली नाही. पेरण्यांचे प्रमाणही कमी आहे, अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावू नका असे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २० एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली होती.

या बैठकीत नाशिक जिल्हा बॅंक सक्तीने वसुली करत असल्याचा मुद्दा चर्चीला गेला होता. आज झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जैन समाजावर कारवाई का करत नाही? पोलिसांनी धरपकड करताच मराठी आंदोलकांचा संतप्त सवाल|VIDEO

Local Train Video: लोकल ट्रेनमध्ये तरूणीने गायला शिवरायांचा पोवाडा; नेटकरी म्हणाले, 'संस्कार...'

Maharashtra Live News Update: अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच ठार

Krishna Janmashtami 2025: कृष्ण गोकुळाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजा वेळ आणि महत्व

Dadar Kautarkhana Rada: दादर कबुतरखान्याजवळ जोरदार राडा, पोलिसांकडून मराठी आंदोलकांना मारहाण; धरपकड सुरू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT