Sanjay Raut Latest News saam tv
मुंबई/पुणे

तुमच्या पोटात का दुखतं? संजय राऊतांच्या मीडियाशी बोलण्यावरील आक्षेपानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना झापलं

कोर्टाच्या बाहेरची गर्दी आम्ही कंट्रोल करणार का? बाहेर लोक भेटतात त्यावरून तुमच्या पोटात दुखायचं कारण नाही, असं न्यायाधीशांनी म्हटलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडी कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांचा मुक्काम आणखी वाढला आहे. संजय राऊतांच्या जामीन अर्जवरील पुढील सुनावणी आता 2 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. आजच्या सुनावणीत पोलिसांनी संजय राऊतांच्या कार्यकर्ते आणि मीडियाशी बोलण्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यावर न्यायालयाने कडक शब्दात पोलिसांना झापलं आहे.

राज्यातील राजकीय घडमोंडीवर संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी संजय राऊत यांना भेटायला येणाऱ्या व्यक्ती आणि मीडियाशी होत असलेला संवाद यावर आक्षेप घेतला. याबाबत बोलताना न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी म्हटलं की, तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही म्हणता की ही राजकीय केस नाही. मग संजय राऊत बाहेर बोलतात तर प्रश्न काय आहे. राऊत जे बोलतात त्याचा ईडीला काही हरकत नाही. मग पोलिसांना काय प्रॉब्लेम आहे. (Latest News)

यावर बोलतांना पोलिसांनी म्हटलं की यामुळेसुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांच्या माहितीनंतर न्यायाधीशांनी म्हटलं की, इथे गोळीबार होणार आहे का? इतर आरोपींना जेव्हा त्यांचे नातेवाईंकांना भेटायला येता तेव्हा यांना काही हरकत नाही. तेव्हा तुम्ही चहा प्यायला देता, डबा खाऊ देता. मग आता का?

मी बाहेर जाऊन सुरक्षा बघू शकत नाही. तुम्ही मला लेखी द्या. कोर्टाच्या बाहेरची गर्दी आम्ही कंट्रोल करणार का? बाहेर लोक भेटतात त्यावरून तुमच्या पोटात दुखायचं कारण नाही, असं न्यायाधीशांनी म्हटलं.

संजय राऊतांची दिवाळी जेलमध्येच

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिवाळी जेलमध्येच होणार आहे. कारण न्यायालयाने त्यांची जामिनासंदर्भातील सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे वय ५७ यांचं निधन

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT