Manoj Jarange vs Gunaratna Sadavarte Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन फसणार? गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात धाव; याचिकेत काय मागणी?

Manoj Jarange News: वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

Satish Daud

Manoj Jarange vs Gunaratna Sadavarte

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. मराठा समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करा, अन्यथा मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार, असा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. येत्या २० जानेवारीला कोट्यवधी मराठा बांधवांना घेऊन मुंबईत धडकणार, असंही जरांगेंनी सांगितलं आहे. दरम्यान, जरांगेंच मुंबईतील आंदोलन फसण्याची शक्यता आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारण, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधात (Maratha Reservation) हायकोर्टात धाव घेतली आहे. मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीस धरत असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा, अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.

त्यामुळे हायकोर्ट आता याचिकेवर काय निर्णय देतं? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे. विशेष बाब म्हणजे, यापूर्वी देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती.

मात्र, हायकोर्टाने या याचिकेवर ताडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. मुंबईत आंदोलनाच्या भीतीने आम्ही याचिका दाखल करून घेऊ शकत नाही. आम्हाला महत्त्वाची कामे आहेत. या विषयाशी संबंधित प्रशासनाकडे जा. आम्ही येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसलो नाही, अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारलं होतं.

दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोदात हायकोर्टात धाव घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशा आशयाची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. हायकोर्ट यावर काय निर्णय घेतं हे देखील पाहण महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT