Aditya Thackeray
Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस 'स्थगिती सरकार' होणार का? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज यावर प्रतिक्रीया दिली. 'या अगोदर आमच्या सरकारला देवेंद्र फडणवीस स्थगिती सरकार म्हणत होते, आता शिंदे-फडणवीस सरकार स्थगिती सरकार होणार आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी केला.

माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज आरे येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. आता हे सरकार केंद्र सरकारला सांगत आहे, कांजूरमार्गची जागा मेट्रो लाईनला द्या. आपणही कारशेड दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे साडे आठ ते दहा हजार कोटी रुपये वाचवत होतो. कारशेडचा प्लॅनिंगही बरोबर नव्हते, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

आमच्यावरचा राग या सरकारने मुंबईवर काढू नये. या आरेमध्ये आम्ही ८०० एकर जागा फॉरेस्ट म्हणून जाहीर केली आहे. हे सरकार मुंबई विरोधी आहे. मुंबई विरोधात हे सरकार राग व्यक्त करत आहे, असंही ठाकरे म्हणाले.

हे सरकार आम्ही सुरू केलेल्या प्रोजेक्टला स्थगिती देत आहे, सरकार बदलले म्हणून चांगल्या प्रोजक्टला स्थगिती देणे बरोबर नाही, आपण असल्या जंगलांना संपवले तर अवघड होईल. आपण या जंगलात रस्ते केले आहेत, पण आपण झाडे तोडलेले नाही, असंही ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Voting | नाशकात Thackeray गट आणि BJP आमनेसामने

Maharashtra Lok Sabha Voting Live: अनिल अंबानी यांनी रांगेत उभा राहून बजावला मतदानाचा हक्क

Bangladesh MP: मोठी बातमी! बांगलादेशचे खासदार भारतात आल्यानंतर बेपत्ता, ३ दिवसांपासून शोधमोहिम सुरू

Cannes Film Festival 2024 : "आज तू हवी होतीस...", कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट

Jalgaon crime : कुटुंब गाढ झोपेत; खिडक्यांच्या काचा फोडून लांबवीले ६७ हजाराचे दागिने

SCROLL FOR NEXT