Covid-19 : रुग्णसंख्या किंचित घटली; देशात गेल्या २४ तासांत १८,२५७ नवे कोरोना रुग्ण

Corna Latest News : गेल्या 24 तासांत भारतात नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 14,553 रुग्ण बरे झाले आहेत.
india reports 18257 fresh cases and 43 deaths in the last 24 hour
india reports 18257 fresh cases and 43 deaths in the last 24 hourSaam Tv
Published On

नवी दिल्ली: देशातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. काल, शनिवारी गेल्या 24 तासांत भारतात 18,257 नवे कोरोना रुग्ण (Covid19) आढळले आहेत, तर 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत भारतात नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 14,553 रुग्ण बरे झाले आहेत. (India Corona News In Marathi)

हे देखील पाहा -

शुक्रवारी देशात 18,840 नवे कोरोना रुग्ण आढळले होते, तर 43 जणांचा मृत्यू झाला होता. आता एका दिवसानंतर या आकडेवारील शुक्रवारच्या तुलनेत कमी रुग्ण आढळले आहेत. आता भारतातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 1,28,690 वर पोहोचली, तर मृतांची संख्या ही 5,25,428 वर पोहोचली आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एकूण प्रकरणांपैकी ०.३०% सक्रिय प्रकरणे (Covid 19 Active Case) आहेत. तर देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.50% इतका नोंदवला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट हा 4.22 टक्के आणि आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 4.08 टक्के होता.

india reports 18257 fresh cases and 43 deaths in the last 24 hour
Pandharpur : 'इस्कॉन' चं सामाजिक बांधिलकी जपण्याचे माेठं कार्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेची संख्या 198.76 कोटींवर पोहोचली आहे. (Covid Vaccination) लसीकरण कार्यक्रमांतर्गत गेल्या 24 तासांत आतापर्यंत 4,32,477 हून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com