Aditya Thackeray Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai: 'राज्याला अंधकारात नेणारे सरकार...' आदित्य ठाकरेंची CM शिंदेंवर सडकून टीका, म्हणाले; 'गद्दारांचे सरकार देशासाठी...'

शिंदे- फडणवीस सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aditya Thackeray: आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची वरळीतील जांभोरी मैदानावर होत आहे. ठाकरे गटाकडून ''शिवसेना' (ShivSena) नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह गेल्यानंतर आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी हे गद्दारांच सरकार राज्याला दिल्लीसमोर झुकवण्याच काम करत आहे, अशा शब्दात शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली. (Latest Marathi News)

मुंबईतील वरळीत ठाकरे गटाकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आली होती. या सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार सचिन अहिर, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर असे दिग्गज नेते या सभेला उपस्थित होते.

सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी "गद्दारांनी नाव चोरलं, खुर्च्या चोरल्या पण प्रेम चोरु शकतं नाही, जनतेच्या मनातून आम्हाला काढू शकत नाही, हम उनके दिल मे है," अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. तसेच हे आधी हे ED सरकार होते, पण आता BC म्हणजेच बिल्डर्स आणि कॉन्ट्रक्टर्स चं सरकार झालं आहे," असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackerayz) यांनी "मुख्यमंत्र्यांनी काम कसं करायला हवं हे आपण जगाला दाखवले. आशिया खंडातील वरळीचा कोळीवाडा हे पहिलं उदाहरण आहे, माहिती नसताना कोविड काळात सर्व मदत लोकांचा घरोघरी पोहोचवली, असे म्हणत हे घटनाबाह्य गद्दारांचे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार," असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lack of sleep effects: खरंच रात्री ८ तासांची झोप नितांत गरजेची आहे? ६ तासच झोपलं तर काय होतं? तज्ज्ञांनी सांगितले परिणाम

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

Alia Bhatt Birthday : आधी स्टार किड म्हणून हिणवलं; आता आहे बॉलिवूडची क्वीन, एका भूमिकेने रातोरात चमकले नशीब

घर खरेदीपासून ते फिरायला जाण्यापर्यंत, १ एप्रिलपासून ७ नियम बदलणार, वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम?

How To Make Mustard Hair Oil: केसांच्या वाढीसाठी मोहरीचं तेल कसं बनवायचं?

SCROLL FOR NEXT