Rahul Kanal Join Shiv Sena Saam Tv
मुंबई/पुणे

Rahul Kanal Join Shiv Sena: आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कानाल यांचा शिवसेनेत प्रवेश

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कानाल यांचा शिवसेनेत प्रवेश

साम टिव्ही ब्युरो

Rahul Kanal Join Shiv Sena: ठाकरे गटाला मुख्यमंत्री शिंदे यांनी आणखी एक धक्का दिला आहे. आज ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आदित्य ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना राहुल कनाल म्हणाले की, "कोविडच्या काळात सर्वजण लोकांना जेवू घालत होते. पण आम्ही एक प्रयोग केला होता की रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खाऊ घालायचं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वांद्र्यातील भागात या कामासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांची हीच सेवाभावी वृत्ती आम्ही शिकलो आहोत. कोविडच्या काळात मी केवळ सेवाच केली मेव्याशी माझा कुठलाही संबंध नव्हता.''  (Latest Marathi News)

ते म्हणले, ''या ठिकाणी दोनतीन दिवसांत मुंबईत बऱ्याच हालचाली घडल्या आहेत. यामध्ये अनेकांनी माझ्यावर आरोप केला की मी राजकारण करत आहे. कोणी म्हटलं की पक्षानं तुम्हाला बरंच काही दिलं. १०० टक्के दिलं पण याचं मी एक हजार टक्के परत दिलं. माझे सहकारी आणि वडिलांना एकनाथ शिंदे यांचं काम आवडत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहेत.''

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, ''राहुलने युवासेनेचे काम केले आहे. आपल सरकार स्थापन होऊन एख वर्ष झाले. आम्ही एक वर्षभरात अनेक कार्यक्रम केले. हे सर्व निर्णय सर्व सामान्य माणसाच्या हिताचे घेतले. आपले सरकार स्थापन होण्यापूर्वी जे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामध्ये अनेक अनुभव आहे. राहुल कनालला अनेक अनुभव आले असतील कारण तो अगदी जवळ होता.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT