Shivsena Saam TV
मुंबई/पुणे

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने चक्क शिलाई मशीनच पळवल्या? शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीएमसीच्या १५० शिलाई मशीन लपवल्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) माजी नगरसेवकाने दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठीच्या शिलाई मशीन लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांच्याकडून करण्यात आला आहे.

मुंबई उपनगरातील दहिसर पूर्व प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी महापालिकेच्यावतीने दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठीच्या १५० शिलाई मशीन लपवून ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

महापालिकेकडून झोपडपट्टी भागातेली गरजू आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना शिलाई मशीन रोजगार निर्मितीसाठी देण्यात येतात. मात्र, बाळकृष्ण ब्रीद यांनी यांच्या नगरसेवक काळात उपलब्ध झालेल्या मशीन महिलांमध्ये न वाटता त्या समाज मंदिराच्या कार्यालयात लपवून ठेवल्या.

पाहा व्हिडीओ -

हा प्रकार शिंदे गटाच्या महिला विधानसभा संघटक मीना पाणमंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. आता या विरोधात शिंदे गट आक्रमक झाला असून या माजी नगरसेवक ब्रीद विरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : दिरासोबतच्या प्रेम प्रकरणात पती अडसर, कुख्ख्यात शुटरकडून नवऱ्यावर गोळी चालवली; पुढे जे घडलं ते भयंकर...

Chanakya Niti : या गोष्टींवर पाय लावल्याने आयुष्यभर भोगावी लागतील पापं

Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT