nashik  Saam tv
मुंबई/पुणे

भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काऊंटर होणार; महिला नेत्याने थेट तारीख सांगितली

ashok Kharat news : भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काऊंटर होणार असल्याचा दावा महिला नेत्याने केला आहे. या महिला नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Saam Tv

अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ

तृप्ती देसाई यांनी त्याचा 24 तारखेला एन्काऊंटर होण्याचा दावा केलाय

अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांनी दिला राजीनामा

सचिन जाधव, साम टीव्ही

भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांनी महाराष्ट्रासह देश हादरून गेला आहे. अशोक खरातचे करारनामे समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची लोकांना फसवून कोट्यवधींची माया कमावली. खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागले. अनेक राजकीय नेत्यांचे खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काऊंटर होणार असल्याचा दावा महिला नेत्याने केला आहे.

राज्यातील बड्या नेत्यांनी अशोक खरातची भेट घेतल्याचे समोर आलं आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशोक खरातने शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे समोर आलं आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. नाशिकच्या भोंदूबाबाचा कारनामा त्याच्या ऑफिसबॉयने उजेडात आणला. त्यानंतर पोलिसांनी अशोक खरातवर कारवाईचा दणका दिला.

अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांनी राज्य आयोगाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याआधी रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकरांनी राजीनामा सोपवला. आता चाकणकर यांना सहआरोपी करून अटकेची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

अशोक खरात प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, 'अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांचा तीनच दिवसात राजीनामा झाला. परंतु आता सुनेत्रा पवारांनी रूपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. अशोक खरातला आता संपवण्याचा डाव होऊ शकतो. कारण अनेक मंत्री राजकारणी यांचे संबंध त्याच्याशी आहेत. ते उघड होऊ नये, यासाठी त्याचा एन्काऊंटर 24 तारखेला होऊ शकतो, अशी शंका काही पीडित व्यक्तींना आहे. त्याच्या एन्काऊंटर डाव मुख्यमंत्र्यांनी उधळून लावावा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट

Curd Making : घरीच बनवा विकतसारखे घट्ट मलईदार दही, विरजण लावताना टाळा 'ही' एक चूक

पक्षातून रुपाली चाकणकरांची हकालपट्टी होणार? राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान|VIDEO

Vastu Shastra: घरात नवरा-बायकोचा आणि कुटुंबाचा फोटो कुठे लावावा? चुकीची दिशा ठरेल वादाचं कारण, जाणून घ्या नियम

Cotton Tops Design: उन्हाळ्यात ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी कम्फर्टेबल कॉटन टॉप्स

SCROLL FOR NEXT