Krishna Prakash Saam Tv
मुंबई/पुणे

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई; वेशांतर करत केलं गुन्हेगाराला जेरबंद

रोषन बागल नावाने वावरणारा हा तरुण स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश आणि विश्वास नागरे पाटील यांचा मित्र असल्याचे सांगत सामान्य नागरिकांना धमकावत त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली.

गोपाळ मोटघरे

पुणे - पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांनी पुन्हा एकदा वेशांतर करून मोठी कारवाई करत ,पोलीस (Police) दलातील अधिकाऱ्यांच्या नावे सामान्य नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला आणि त्याच्या दोन महिला साथीदारांना अटक केली आहे.

रोषन बागल नावाने वावरणारा हा तरुण स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश आणि विश्वास नागरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांचा मित्र असल्याचे सांगत सामान्य नागरिकांना धमकावत त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली आणि त्यांनी तातडीने आरोपीला जेरबंद करण्याचं ठरवलं, त्यानुसार वेष बदलून आयुक्त कृष्ण प्रकाश स्वतः आरोपी समोर बसले आणि आपण काम करवून घेण्यासाठी आल्याचं भासवत त्यांनी आरोपीला रोख पैसे दिले,मात्र आरोपीने पैसे स्वीकारताच कृष्ण प्रकाश आपल्या मूळ रूपात आले आणि त्यांनी आरोपी रोषलला रंगेहाथ असं जेरबंद केलं.

हे देखील पहा -

आरोपी रोषनच्या अटकेचा संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद झाला आहे. पोलीस आयुक्तांकडून बेकायदेशीर रित्या काम करवून घेण्यासाठी एका हॉटेल मध्ये बैठकीसाठी आलेला रोशन पोलीस आयुक्तांच्याच जाळ्यात अलगद अडकला. मात्र याआधी त्याने आपल्या घर मालकाला धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार तपासत समोर आला.

या आधीही कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर केलं होतं त्यावेळी त्यांनी आपल्याच खात्यातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी अशी अवस्था करत शिस्त लावली होती. मात्र यावेळी त्यांनी वेष बदलून एका आरोपीला जेरबंद केलं. खरतर सार्वजनिक ठिकाणी एखाद्या सराईत आरोपीला बोलवून त्याला रंगेहाथ जेरबंद करणे तशी जोखमीची कामगिरी असते.

मात्र पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या धाडसामुळे आरोपी रोषन आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात आलेत. त्यामुळे रोषनने आतापर्यंत किती जणांना फसवले आणि सामन्यांची आर्थिक लूट करण्यासाठी कुणा-कुणाची नावे वापरली हे उघड करण्याचं पोलिसांसमोर मोठं अहवाान आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT