Matunga News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी इमारतीवरुन उडी घेत संपवलं जीवन; माटुंगा परिसरातील घटनेने खळबळ

Matunga News : प्रदीप टेमकर असं माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांचं (ACP) नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुबंईतील माटुंगा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. प्रदीप टेमकर असं माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांचं (ACP) नाव आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रदीप टेमकर हे निवृत्तीनंतर माटुंगा पूर्व परिसरातील गंगा हेरिटेट या इमारतीत वास्तव्यास होते. याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून टेमकर यांनी उडी मारली. टेमकर यांनी नैराश्येतून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांना आहे. (Latest Marathi News)

प्रदीप टेमकर हे पत्नी आणि दोन मुले यांच्यासोबत राहत होते. सोमवारी संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास टेमकर घरी एकटे होते. त्यावेळीच त्यांनी आत्महत्या केली. २०१४ साली वाहतूक विभागातून ते निवृत्त झाले होते. माटुंगा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Mumbai News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

SCROLL FOR NEXT