स्वस्तात घर देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी गजाआड प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

स्वस्तात घर देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी गजाआड

मन्सूर अली शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात घर देतो सांगून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता आणि तो फरार झाला होता.

प्रदीप भणगे

कल्याण :  कल्याणपासून जवळ असलेली नेवाळी परिसरातील जागा ही भारतीय वायू सेनेच्या नावावर आहे. असे असताना या जागेवर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे तोडून सध्या चाळ माफियांनी अतिक्रमण केलं आहे. विशेष म्हणजे कोणतीही सरकारी यंत्रणा इथे लक्ष देत नाही. त्यामुळे भुमाफियांचं चांगभलं होत आहे. याचाच फायदा घेत आरोपी माजिद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात घर देतो सांगून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता आणि तो फरार झाला होता. अखेर सात वर्षांनी कल्याण गुन्हे शाखेच्या तावडीत तो सापडला आहे. (Accused arrested for cheating citizens by offering cheap house)

हे देखील पहा -

नेवाळी परिसर हा डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ क्षेत्राच्यामध्ये असल्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या परिसरात घर घेण्यासाठी येत आहेत. स्वस्तात घर मिळतात म्हणून गोर गरिबांनी नेवाळीमध्ये घर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ज्या जागेवर त्यांची घरं उभारली जात आहेत, ती जागाच भारतीय वायुसेनेच्या नावावर आहे. याची कोणत्याही प्रकारची माहिती ग्राहकाला दिली जात नाही.

अशाच पद्धतीने नेवाळी मध्ये २०१४ साली अनधिकृत चाळींमध्ये स्वस्तात घर देण्याचे अमिश दाखवून गोर गरीब नागरिकांना तब्बल दिड कोटी रुपयांचा चुना लावून आरोपी माजिद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धूम ठोकून गेले होते. या सहा जणांच्या टोळीमधील पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र या प्रकरणाचा मोरक्या हा पोलीस यंत्रणांना सापडत नव्हता. या नागरिकांच्या केलेल्या फसवणुकीमुळे कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास कल्याण गुन्हे विभागाची टीम करत होती. अखेर शेख हा आरोपी पोलीस यंत्रणांच्या हातात सात वर्षांनी लागला आहे. मात्र गोरगरीब जनतेची झालेली फसवणूक, गुंतवलेले पैसे कसे मिळणार याचे उत्तर मात्र अजून अनुउत्तरितच आहे.    

मुंबईमधील घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगरमधील हिंदुस्थान चाळीत राहणारा माजिद अली उर्फ गुड्डू मन्सूरअली शेख हा वेळोवेळी आपली जागा बदलत होता. पोलिसांची पथक त्याला गेल्या सात वर्षांपासून विविध ठिकाणी शोधत होते. अखेर हा माजिद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख नवी मुंबईमधील कामोठे परिसरातील तिरुपती अपार्टमेंटमध्ये लपला असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे प्रकटीकरण विभागाला मिळाली होती.

यानुसार पोलिसांनी इमारतीत घुसून घरात लपून बसलेल्या शेखला बेड्या ठोकल्या आहेत. स्वस्तात घर देण्याचे अमिष दाखवून गोर गरीब जनतेची फसवणून करणाऱ्या माजिद अली उर्फ गुड्डू मन्सूरअली शेख याची लखनौमध्ये १ कोटी ७५ लाखांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. ही संपत्ती जप्त करून तिचे लिलाव करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. एवढं होऊन सुद्धा हा आरोपी पोलिसाना गुंगारा देत होता. अखेर त्याला नवी मुंबईमधून कल्याण गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT