Mumbai Praja foundation Saam TV
मुंबई/पुणे

मुंबई असुरक्षित बनतेय? २०१२ ते २०२१ दरम्यान बलात्काराच्या घटनांमध्ये २३५% वाढ, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून अनेक प्रश्न उपस्थित

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार २०१२ ते २०२१ च्या अहवालानुसार अपहरणाच्या गुन्ह्यांत ६५०% वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई शहर (Mumbai News) राहण्यासाठी सुरक्षित शहरांपैकी एक मानलं जात. मात्र प्रजा फाऊंडेशनच्या एका अहवालानंतर या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुबंई शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. महिलांची सुरक्षिततेचा मुद्दाही या आकडेवारीतून समोर आला आहे. तसेच मुंबई पोलिसांची (Mumbai Police) ताकद एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सुरक्षित ठेवण्यासाठी अपुरी पडत असल्याचंही या आकडेवारीतून अधोरेखित होत आहे.

प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

>> २०१२ ते २०२१ च्या अहवालानुसार अपहरणाच्या गुन्ह्यांत ६५०% वाढ झाली आहे.

>> २०१२ ते २०२१ च्या अहवालानुसार महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये २३५% वाढ झाली आहे.

>> २०१२ ते २०२१ च्या अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात १७२% वाढ झाली आहे.

>> २०१८ मध्ये पोलीस दलात २२% पदे रिक्त होती. तर २०२२ मध्ये २८% पदे रिक्त आहेत.

>> महिला व मुलांवरील गुन्ह्यांचे ९६% खटले २०२१पर्यंत सुनावनीसाठी प्रलंबित आहेत.

>> २०२१ पर्यंत पोस्को अंतर्गत नोंदवलेले गुन्हे ९६% प्रलंबित आहेत. (Mumbai News)

२०२१ मध्ये मुंबईत दाखल करण्यात आलेल्या ८८८ बलात्काराच्या गुन्ह्यांत ५९% गुन्हे पोस्को अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे पीडितांच्या ओळखीचे आहेत. महिला व लैगिक अत्याचाराबाबत २०२०-२०२१ मध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी मुंबईतील आमदारांनी फक्त १५% प्रश्न उपस्थित केले आहेत.

महिलांबाबत नोंदवण्यात आलेले बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत ५४% टक्के आरोपी हे मित्र, प्रियकर, लग्न करण्याचे आमिष दाखवणारे, नातेवाईक यांचा समावेश आहे. २०२१ मध्ये नोंदवण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यांची संख्या २५,८४१ असून त्यातील ६९९२ गुन्ह्यांमध्ये म्हणजेच २७% आरोपपत्र दाखल केले आहेत. तर १७,४४५ हजार गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरू असून त्याचे प्रमाण ६८% आहे.

मुंबई बोरिवली, दहिसर, मालाडपूर्व परिसरात सर्वाधित गंभीर गुन्ह्यांची नोंद

  • हत्या - ३७

  • बलात्कार - २०८

  • दंगल - १०८

  • मारामारी - १३००

  • सोनसाखळी चोरी - ५५

  • घरफोडी - ५००

  • चोरी - २३९

  • फसवणूक - १५००

  • वाहनचोरी - १०००

मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव अंधेरी हे परिसर दुसऱ्या क्रमांकावर

  • हत्या - ३२

  • बलात्कार - १२७

  • दंगल - २७

  • मारामारी - ८०२

  • सोनसाखळी चोरी - २७

  • घरफोडी - २७५

  • चोरी - ११५

  • फसवणूक - ४८५

  • वाहनचोरी - ५१८

मुलुंड, घाटकोपर, शिवाजीनगर हे परिसर गुन्हेगारीत तिसऱ्या क्रमांकावर

  • हत्या - ३०

  • बलात्कार - २६

  • दंगल - ७०

  • मारामारी - ९०८

  • सोनसाखळी चोरी - १५

  • घरफोडी - ३०२

  • चोरी - १३३

  • फसवणूक - ७९०

  • वाहनचोरी - ६१९

विलेपार्ले, कुर्ला, वांद्रे हे परिसर गुन्हेगारीत चौथ्या क्रमांकावर

  • हत्या - २६

  • बलात्कार - २६५

  • दंगल - ८०

  • मारामारी - १०४३

  • सोनसाखळी चोरी - ३७

  • घरफोडी - ४००

  • चोरी - २००

  • फसवणूक - ११३६

  • वाहनचोरी - ९११

चेंबूर, सायन कोळीवाडा, माहिम हा परिसर गुन्हेगारीत पाचव्या क्रमांकावर

  • हत्या - ४४

  • बलात्कार - १४३

  • दंगल - ५७

  • मारामारी - १०१२

  • सोनसाखळी चोरी - ३३

  • घरफोडी - ४४२

  • चोरी - १७१

  • फसवणूक - ८५३

  • वाहनचोरी - ६६२

वरळी, भायखळा, कुलाबा, मलबार हिल परिसर गुन्हेगारीत सहाव्या क्रमांकावर

  • हत्या - ३०

  • बलात्कार - ८९

  • दंगल - ५०

  • मारामारी - ४३०

  • सोनसाखळी चोरी - २१

  • घरफोडी - २१९

  • चोरी - ९६

  • फसवणूक - ८०१

  • वाहनचोरी - ४३८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT