Worli Sea Link Accident News: वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघतात पाच जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking Marathi News)
वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मध्यरात्री तीन वाजता हा अपघात झाला. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्यामुळे वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.
वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मध्यरात्री तीन वाजता हा अपघात झाला. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्यामुळे वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.
अपघात झाल्यानंतर जखमींना नेण्यासाठी आलेल्या रूग्णवाहिकेलाही दोन गाड्यांनी धडक मागून दिली. या अपघातात एकून ५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णायात दाखल करण्यात आले.
वरळी सी लिकवर थांबण्यास बंदी असतानाही काही गाड्या या थांबल्या होत्या. त्यावेळी मागून वेगात आलेल्या वाहनांने उभ्या असलेल्या वाहनांना जबर धडक दिली. हा संपूर्ण अपघात CCTV मध्ये कैद झाला आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आले असताना पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहे. तर वरळी सी लिकवरथांबण्यास बंदी असताना वाहने घातल्याने हा अपघात झाला असावा असा प्रार्थमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.