ST Bus Accident Saam Tv
मुंबई/पुणे

ST Bus Accident: पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ४० हून अधिक प्रवासी जखमी

Daund Accident News: पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.

Saam Tv

मंगेश कचरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दीत दोन एसटी बसचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यात चाळीस अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी यवत पोलिसांनी भेट दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, वरवंडमधील कवटीचा मळा परिसरात ही घटना घडली आहे. परिसरातील सुमारे पाच रुग्णवाहिका जखमींना दवाखान्यात दाखल करण्यासाठी हजर होत्या. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही एसटी एकमेकांना धडकल्यानंतर या एसटी आणि प्रवासी बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.

बीडमध्ये १५ मिनिटांत २ अपघात

दरम्यान, बीड - महामार्ग प्राधिकरणाच्या गलथानपणामुळे टोल नाक्यावर दोन अपघात झाले होते. या अपघातात सात जण जखमी झाले होते. यामध्ये दोन महिन्याच्या मुलीचाही समावेश होता.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर -अहमदनगर-राष्ट्रीय महामार्गावरील केज परिसरातील टोल नाक्यावर, रस्त्यावर टाकलेला मातीचा ढिगारा आणि सिमेंट काँक्रिटच्या अवशेषांच्या ढिगाऱ्याला धडकून कारचा भीषण अपघात झाला होता. अपघातात कारने दोन-तीन पलट्या खाल्ल्या. यात २ महिन्याच्या मुलीचा हात तुटला आहे. तर चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच मुलीची आई, पाच वर्षाची मुलगी, आज्जी, मुलीचा चुलता हे गाडीतील सहाजण जखमी झाले होते.

याच ठिकाणी टोल नाक्याच्या दुसऱ्या बाजूला अपघातातनंतर पंधरा मिनिटाच्या अंतराने दुसरा अपघात झालाय. त्यात चालक जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT