CIDCO Land Officer Arrested Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

CIDCO Land Officer Arrested: नवी मुंबईतील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. २२ हजारांची लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली.

Priya More

Summary:

  • नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक

  • सिडको अधिकाऱ्यावर एसीबीची मोठी कारवाई

  • रामदास जगताप लाचखोरी प्रकरणात अटकेत

  • नवी मुंबई एसीबी सापळा कारवाई

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना २२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. रामदास जगताप हे सिडकोचे भूमी व भूमापन मुख्य अधिकारी देखील आहेत. या कारवाईमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीने सापळा रचत सिडकोच्या मुख्य भूमी अधिकाऱ्यांना अटक केली. पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने यशस्वी सापळा रचत ही कारवाई केली. सिडकोच्या २२.५ टक्के योजनेतील रजिस्ट्रेशन प्रकरणात २२,५०० रुपयांची लाच घेताना ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी रामदास हरिभाऊ जगताप (५७ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे.

रामदास जगताप यांच्या सूचनेनुसार शिपाई हरेश सोनवणेने रक्कम स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. रामदास जगताप आणि हरेश सोनवणे या दोघांन एसीबीने अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई नवी मुंबई एसीबी युनिट करत आहे. या कारवाईमुळे नवी मुंबईच्या सिडकोमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबई लोकल हादरली! पावसात डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, २२ वर्षीय तरुणाची चाकून भोसकून हत्या

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आंदोलकांना फोन

पावसात फोन भिजला तर लगेचच करा 'या' 5 गोष्टी, फोन बंद पडण्यापासून वाचेल

Sleep quality: झोपण्यापूर्वी ही कामं करूच नका; मिळेल शांत झोप

Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या २४ कॅरेट आणि २२ कॅरेटचे ताजे भाव

SCROLL FOR NEXT