Congress MLA Saam TV
मुंबई/पुणे

विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई; पक्षाकडून नोटीस

आमदारांच्या या हलगर्जीपणाची दखल घेत आता काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी ९ आमदारांना शिस्त पालन कमिटी नोटीस बजावणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: शिंदे-भाजप सरकारच्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर होते. आमदारांच्या या हलगर्जीपणाची काँग्रेस (Congress) हायकमांडने गंबीर दखल घेतली आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या आमदारांबाबातची तक्रार काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेत आता काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी ९ आमदारांना शिस्त पालन कमिटी नोटीस बजावणार आहे. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबतचा अवहाल काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे दिला आहे.

दरम्यान, आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोले यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीत हायकमांड चुकीच्या आमदारांवर कारवाई करण्याबाबत गंभीर आहे. ज्यांनी क्रॉस व्होट केले आणि जे फ्लोअर टेस्टला गैरहजर राहिले अशा आमदारांवर कारवाई करावी याबाबतचा अहवाल सादर केला असून या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. मात्र, कारवाईचे स्वरूप काय असेल हे काँग्रेस हायकमांड आणि शिस्तपालन समिती ठरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण -

विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची काही मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. यानंतर भाजपच्या उमेदवारांनी १० पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी-शिवसेनेचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी झाले होते तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला होता. दरम्यान, शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळीही काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर होते. आपल्याला सभागृहात येण्यास उशीर झाला असल्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २५ हजारांची पेन्शन थेट ८७,५०० रुपये होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

Ramayana Movie Review : रामाची मर्यादा, रावणाचा अहंकार अन् सीतेची शक्ती; रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला?

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT