Prasad Lad News | Mumbai Bank Case  Saam Tv
मुंबई/पुणे

प्रसाद लाड यांच्या अडचणीत वाढ, मुंबै बँके प्रकरणी 'आप'चं गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र

प्रसाद लाड यांच्याविरोधात आपने विधान परिषद सभापती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात आपने विधान परिषद सभापती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. मुंबै बँकेच्या निवडणुकीच्या मतदार संदर्भातील चौकशी करण्यात यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रविण दरेकरांनंतर आता प्रसाद लाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे (AAPs Letter To Home Minister And Commissioner Of Police).

आपची मागणी काय?

प्रसाद लाड (Prasad Lad) हे मुंबै बँकेचे संचालक आहेत. मुंबै बँकेच्या (Mumbai Bank) 2021-2026 या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची मतदार यादीनुसार प्रसाद लाड हे 'क्रिस्टल कर्मचारी सहकारी संस्था मर्यादित' या संस्थेतर्फे मतदार आहेत असे नमूद आहे.

पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या उपिवधी मधील पृष्ठ क्रमांक 4, ड 1.1 मधील क्रमांक 1 नुसार कोणत्याही व्यक्तीला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनयम 1960 कलम 22 प्रमाणे काही अटीची पूर्तता केल्याशिवाय सभासद होता येत नाही. मालकाच्या धोरणानुसार "कोणताही सेवक तो कायम /सेवक (Permanent) (एम्प्लॉईज) असला पाहीजे. उद्देशानुसार संस्थेचे सभासदत्व हे फक्त कायम कर्मचारी असलेल्या व्यक्तीलाच देण्यात येते"

प्रसाद लाड हे पगारदार नोकर नाहीत - आप

पण, प्रसाद लाड हे विधान परिषदेचे आमदार आहेत. व्यवसायाने ते उद्योजक आहेत. पगारदार नोकर नाहीत. गेले कित्येक वर्षे ते मुंबै बँकेत पगारदार नोकरांच्या सहकारी संस्थेतर्फे निवडून जात आहेत. हे अत्यंत गंभीर आणि जनतेची दिशाभूल करणारे आहे, असा आरोप आपकडून (AAP) करण्यात आला आहे .

या संदर्भात विधान परिषदेने सखोल चौकशी करुन निर्णय घ्यावा, अशी विनंती आपच्या धनंजय शिंदे यांनी आपल्या पत्रात केलीय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लपलाय 'हा' भव्य-सुंदर पुरातन किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे ट्रिप प्लान करा

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

Akola Fire : अकोल्यात भल्या पहाटे अग्नितांडव, जेजे मॉलला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT