Aaditya Thackeray News: आमदार आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल सुरूच आहे. अजित पवारांनी शिंदे सरकरला पाठिंबा देत ९ मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. तर अजित पवारांच्या रुपाने शिंदे गट आणि भाजपला नवा साथीदार लाभला आहे. काल शिंदे सरकारच्या मंत्रिमडळात फेरबदल करण्यात आले. या खातेवाटपावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा आहे. (Latest Marathi News)
अजित पवार गटाच्या ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर १३ दिवस खातेवाटप रखडला होता. शिंदे गटाचा अजित पवारांना अर्थ खाते देण्याला विरोध होता, अशी चर्चा होती. त्यात खातेवाटपावरील तोडग्यासाठी दोन दिवसांपूर्वीच तिन्ही नेते दिल्ली दरबारी गेले होते. दरम्यान, शिंदे सरकारच्या या खातेवाटपावरून आदित्य ठाकरेंनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, 'चला, अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खातेवाटप झालं. पहिले २०, नंतर ९ असा विस्तार झाला. आता या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत'.
'त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने ३३ देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी खातेवाटपावरून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. खातेवाटपावर भाष्य करताना राऊतांनी मोठा दावा केला. 'दिल्लीने सांगितले की अर्थ खाते तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रिपद अजितदादांना द्या, असं दिल्लीने सांगितलं. या गोष्टीवरून शिंदेंनी माघार घेतली. ही माझी पक्की माहिती आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.