Washi Accident Saam TV
मुंबई/पुणे

दुर्दैवी! झाडांची छाटणी करत असताना खाजगी कर्मचाऱ्याला गमवावे लागले प्राण

वाशी येथे झाडांची छाटणी करत असताना एका खाजगी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सिद्धेश सावंत

नवी मुंबई : वाशी येथे पावसाळा पूर्व झाडे छाटण्याचे काम करत असताना एका खाजगी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावसाळा जवळ आल्याने मुंबईसह नवी मुंबईमधील (Navi Mumbai) पावसाळा पुर्व कामे पुर्ण करण्यासाठी पालिकेसह खासगी यंत्रणा सज्ज झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

नाले सफाई आणि रस्त्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं ही कामं पावसाळ्यापुर्वी प्रामुख्याने केली जातात. झाडांच्या फांद्याचा वीजेच्या तारांशी संपर्क झाल्यास काही अपघात होऊ नयेत यासाठी झाडांच्या फांद्यांची छाटणी करतात.

हे देखील पाहा -

त्यासाठीच वाशीतील (Vashi) एका सोसायटीमधील काही झाडांची छाटणी करत असतानाच झाडावरून जाणाऱ्या विजेचा तारेचा शॉक लागल्याने एका खासगी कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान, पावसाला आता सुरुवात झाली असून पावसामध्ये आणि पावसाळापुर्व कामे करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad Times Sign: वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात हे संकेत, वेळीच ओळखा

Akshay Kumar: 'गुटखा तोंडात दाबून...' पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: परभणीच्या गंगाखेड तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाचा मोर्चा

Skin Care Tips: महिलांनो, रात्री झोपण्यापूर्वी ही चूक तर करत नाही ना? अन्यथा...

Loni Police : पोलिसाकडून दुकानदाराला मारहाण; दुकान बंद करण्यावरून झाला वाद

SCROLL FOR NEXT