कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीच्या अटकेनंतर अनेक तक्रारदार आले पुढे; वाकोला पोलिस ठाण्यात नवा गुन्हा दाखल Saam Tv
मुंबई/पुणे

कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीच्या अटकेनंतर अनेक तक्रारदार आले पुढे; वाकोला पोलिस ठाण्यात नवा गुन्हा दाखल

पुजारीने एका कंपनीच्या संचालकाला २२ मार्च २०२१ मध्ये दुपारच्या सुमारास परदेशतून धमकी दिली होती.

सुरज सावंत

मुंबई: कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलिपिन्स (Philippines) येथे अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला एटीएसच्या (ATS) ताब्यात दिले होते. त्यानंतर एटीएसने त्याला ठाणे (Thane) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान कुख्यात गुंड सुरेश पुजारी (Gangster Suresh Pujari) याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पुजारीच्या अटकेनंतर आता अनेक तक्रारदार समोर येत आहे. पुजारीवर वाकोला पोलिस ठाण्यात नवा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (After the arrest of notorious gangster Suresh Pujari, many complainants came forward; A new case has been registered at Wakola police station)

हे देखील पहा -

पुजारीने एका कंपनीच्या संचालकाला २२ मार्च २०२१ मध्ये दुपारच्या सुमारास परदेशतून धमकी (Threat) दिली होती. पुजारीने याच दरम्यान संचालकाला तीन ते चार खंडणीचे फोन केले होते. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी पुजारीने या संचालकाला दिली होती. मात्र पुजारी विरूद्ध तक्रार दिल्यास जीवाचे बरे-वाईट होईल या भितीने त्याने आतापर्यंत पोलिसांची मदत घेतली नाही. मात्र पुजारीच्या अटकेची बातमी टिव्हीवर पाहिल्यानंतर तक्रारदाराने सोमवारी वाकोला पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता हा गुन्हा मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग केला जाऊ शकतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sadabhau Khot : 'माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत...' भरसभेत सदाभाऊ खोत ढसाढसा रडले; पाहा VIDEO

CancerAwareness : कर्करोग परत होण्याची शक्यता जास्त कधी असते? जाणून घ्या उपचार आणि बचावाचे मार्ग

Akola : पुरी- अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफची कारवाई

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Manoj Jarange: बीडमधून जरांगेंची तोफ धडाडणार, आज निर्णायक सभा; नेमकं काय बोलणार?

SCROLL FOR NEXT