Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबई हादरली! लाॅजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर दोघांनी केले लैंगिक अत्याचार

याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

सुरज सावंत

Mumbai Crime News: मुंबईच्या (Mumbai) सीएसटी परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. २ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीला न्यायालयाच्या आदेशानंतर महिला आश्रम येथे ठेवण्यात आले. मानसिक स्थिती ठिक नसल्याने तिला उपचारासाठी नायर रुग्णालयात (Hospital) दाखल केले होते. (Mumbai Latest Crime Update)

मात्र, २१ आॅक्टोंबर रोजी पीडित मुलगी ही तिच्या जागेवरून न सांगता निघून गेली होती. ती फिरत फिरत सीएसटी स्थानक परिसरात पोहचली. सीएसटी स्थानक येथे सोनू व राजेंद्र नावाच्या दोन व्यक्ती तिला भेटले. तिची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे पाहून दोघांनी तिला तेथील एका लाॅजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेला वैदयकिय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग आंबेडकर पोलीस ठाण्यात दोघांवर 363,376 (2)(आय) (एल), 376(ड)(अ), 34 भादंवि सह कलम 4,6,8,12 पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, पीडित मुलीला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ती रुग्णालयातून कुणालाही न सांगता निघून गेली होती. त्यानंतर ती सीएसटी स्थानक परिसरात पोहचली तिथे तिच्यावर २ आरोपींनी अत्याचार केला. आरोपीचा शोध सुरु असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT