Pune Crime news  saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : जेवायला न दिल्यानं मित्राचा कान चावून तुकडाच पाडला, पुण्यातील धक्कादायक घटना

अंगावर काटा आणणारी ही घटना पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Satish Daud

पुणे : जेवायला घातलं नाही म्हणून दोन मित्रांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. वाद इतका विकोपाला गेला की, एका मित्राने दुसऱ्या मित्राचा कान चावून तोडून टाकला. अंगावर काटा आणणारी ही घटना पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सचिन कुंभार (वय ३९ वर्ष) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिनने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अनिकेत कांबळे (वय ३५ वर्ष) याला अटक केली आहे. हा सगळा प्रकार २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मार्केटयार्ड मधील फुल मार्केटच्या पार्किंग मध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कुंभार आणि अनिकेत कांबळे हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात आणि कात्रज भागात एकत्र वास्तव्यास आहेत. २७ जानेवारी रोजी सचिन ते त्यांच्या मैत्रिणी सोबत मार्केट यार्ड येथे असलेल्या फुल मार्केटच्या पार्किंग मध्ये बोलत थांबले होते.

यादरम्यान आरोपी अनिकेत कांबळे तिथे आला आणि त्याने सचिनला मला खायला दे किंवा जेवायला चल अशी विचारणा केली. यावर सचिनने नकार दिल्यानंतर अनिकेतला राग अनावर झाला आणि त्याने शिवीगाळ केली. यावरच तो न थांबता त्याने सचिनला धरलं आणि त्याच्या कानाचा जोरात चावा घेतला.

अनिकेतने सचिनेच्या कानाला इतका जोरात चावा घेतला, की सचिनच्या कानाची पाकळी तुटून पडली आणि यात सचिन गंभीर जखमी झाला. यानंतर सचिन येथे पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात या प्रकरणी भारतीय दंडात्मक कलम ३२५, २९४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT