Mumbai Fire सुमित सावंत
मुंबई/पुणे

Mumbai : लालबागमध्ये 60 मजली इमारतीला भीषण आग; खाली पडून एकाचा मृत्यू

लेव्हल 3 ची आग आता लेव्हल 4 मध्ये पोहचली.

वैदेही काणेकर,माधव सावरगावे, साम टीव्ही

मुंबई : लालबाग (Lalbaug) मधील वन अविघ्न पार्क येथील एका 60 मजली इमारतीला (Building) आग लागली आहे. या आगीचं स्वरुप खूप भयानक असून याची भयानकता तेथील एका घटनेवरुन समजून येत आहे. या इमारती मधील एक व्यक्तींने आपला जीव वाचविण्याकरता खूप वेळ प्रयत्न केला मात्र अखेर तो 19 व्या मजल्यावरुन खाली पडून त्याचा मृत्यू झाला. तर कित्येक जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.

हे देखील पहा -

या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या (Fire brigade) 15 गाड्या इमारती जवळ दाखल झाल्या आहेत. करी रोड स्टेशनजवळील ही इमारत असून 19 व्या मजल्यावरुन आगीपासून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करणारा एक तरुण खाली पडून मृत झाला आहे हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तसेच ही आग 25 व्या मजल्यापर्यंत आग पोहोचली आहे.

तसेच लेव्हल 3 ची आग आता लेवल 4 मध्ये पोहचली असून आणखी अग्निशामकच्या गाड्या वाढविल्या आहेत. ही आग मध्येच लागल्यामुळे खाली आणि वर अशी ती पसरत आहे. महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) या घटनास्थळी पोहोचल्या त्यांनी अजून दोन जण आतमध्ये आहेत तसंच राम तिवारी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं असल्याची माहिती महोपौरांनी दिली. जखमींना केईएम रुगणालयात हलविण्यात आलं असल्याचीही माहिती सांगितली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

भाजप नेत्याचा 'हायटेक' कारनामा, एमटीएनएलच्या २० लाखांच्या केबलवर डल्ला; १३ जण गजाआड

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT