A female police officer was molested by a fellow constable in khar police station SaamTv
मुंबई/पुणे

धक्कादायक! सहकारी हवालदारानेच केला महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग; गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime News: ८ एप्रिलला आरोपी शिपायाने महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर रात्री १२ च्या सुमारास प्रपोजल मेसेज पाठवला.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात सहकारी अधिकारी महिलेचा पोलिस शिपायाने विनयभंग (Molested) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा महिला अधिकाऱ्याला (Female Police Officer) व्हॉट्सॲपवर (Whatsapp) हेतू पुरस्सर मेसेज पाठवत होता. इतकचं काय तर महिला अधिकाऱ्याचा पाठलागही करायचा. दरम्यान ८ एप्रिलला आरोपी शिपायाने महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर रात्री १२ च्या सुमारास प्रपोजल मेसेज पाठवला. (A female police officer was molested by a fellow constable in khar police station)

हे देखील पहा -

सहकारी पोलिस शिपायाच्या दिवसें-दिवस वाढत असलेल्या या त्रासाला कंटाळून महिला अधिकाऱ्याने संबधित सहकारी पोलिस हवालदाराविरोधात खार पोलिस ठाण्यात ३५४(ड), ५०९, भा.द.वि सह ६७ माहिती तंत्रज्ञान ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. महिला पोलिस शिपायाची छेड अथवा फसवणुकीचा हा काही पहिलाच गुन्हा नाही. नुकताच विलेपार्ले पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीच्या प्रकरणांमुळे महिला सुरक्षित नसल्याची टीका केली जात असताना. या घटनेमुळे पोलिस ठाण्यातील महिलाही असुरक्षित असल्याचे दिसून येते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT