A 20-year-old girl was physically assaulted by a doctor in Pune  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: डॉक्टरचा 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार

Pune Doctor News: पुण्यात एका डॉक्टरने महाविद्यालयीन तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावलं. त्यानंतर दारु पाजून तिच्यावर अत्याचार केला.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Doctor and 20 Year Old Girl News

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरुन झालेल्या ओळखीतून एका डॉक्टरने महाविद्यालयीन तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावलं. त्यानंतर दारु पाजून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

डॉ. शुभंकर महापुरे (वय २६ वर्ष) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टराचं नाव आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरुणी शिक्षणासाठी पुण्यात आली होती. सोशल मीडियावरुन तिची डॉ. शुभंकर याच्यासोबत ओळख झाली होती.

आरोपीने पीडितेला वारंवार मॅसेज करुन तिच्यासोबत ओळख वाढवली. त्यानंतर पीडितेचा विश्वास संपादन करत तिला २४ सप्टेंबर रोजी आपल्या क्लिनिकमध्ये बोलावून घेतलं. तिथे आरोपीने तिला जबदस्तीने (Crime News) दारु पाजली. रात्रीच्या जेवणानंतर पीडितेला गुंगी आली.

याच संधीचा फायदा घेत आरोपीने २० वर्षीय पीडितेवर बलात्कार केला. हा प्रकार लक्षात आल्यावर तरुणीने पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT