95 crore 80 lakhs for Maval taluka in the parliamentary budget
95 crore 80 lakhs for Maval taluka in the parliamentary budget दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Pune: संसदीय अर्थसंकल्पात मावळ तालुक्याला 95 कोटी 80 लाखांचा निधी

दिलीप कांबळे

पुणे: संसदीय अर्थसंकल्प नुकताच मुंबईमध्ये पार पडला. यात मावळ तालुक्याला सुमारे 95 कोटी 80 लाख रुपयांचा निधी (Fund) उपलब्ध झाला आहे. विविध विकास कामांसाठी हा निधी देण्यात आला आहे. त्यात लोणावळा येथील टायगर पॉईंट येथे ग्लास स्कायवॉक, सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज यांच्या तीर्थक्षेत्र विकास करणे यासाठी सुमारे 80 कोटींचा निधी मावळ (Maval) तालुक्यासाठी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यात असणाऱ्या विविध शासकीय इमारतींसाठी देखील भविष्यात निधी आणण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी दिला आहे. अर्थसंकल्पात मावळला काय मिळाले यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हे देखील पहा -

आमदारांच्या घरांच राजकारण केलं गेलं - सुनील शेळके

विरोधी पक्ष आणि सत्ताधरी आमदार यांनी घरांसाठी मागणी केली. ती मागणी मान्य करण्यात आली. परंतु सभागृहाच्या बाहेर आल्यावर वेगळं राजकारण करण्याचं काम करण्यात आलं. घर कोणालाच फुकट मिळणार नाही. विदर्भ, मराठवाडा, खान्देश किंवा कोकण या भागातील आमदार जे 300-400 किमी वरून येतात त्यांच्यासाठी आहेत. मी 160-170 किमी वरून जात असल्याने मला घराची अपेक्षा नाही असं स्पष्ट वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

Maharashtra Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या २४ तासात नवा ट्वीस्ट; समता परिषदेने घेतली नवी भूमिका

Benifits of Guar: अनेकांना नापसंत असणारी गवार आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Ratnagiri Sindhudurg : विनायक राऊतांनी नारायण राणेंचा भूतकाळ काढला; अनेक गोष्टी सांगून टाकल्या!

Pimpri Chinchwad News Today: पिंपरी-चिंचवडमध्ये मर्सिडीजमध्ये चक्क 29 लाखांची रोकड आढळून आल्यानं आश्चर्य!

SCROLL FOR NEXT