Corona Patients in Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये २५ टक्क्यांनी घट, नागरिकांना किंचित दिलासा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती, पण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या (corona new patients) झपाट्याने वाढली होती. १ जून रोजी मुंबईत २,९७० सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतरही काही दिवस नव्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा कमी होताना दिसत नव्हता. दोन हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण मुंबईत (Mumbai corona update) आढळत होते. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं नागरिकांची चिंता वाढली होती. परंतु, मुंबईत आज दिवसभरात कोरोनाच्या नव्या ७६१ रुग्णांची नोंद झाल्याने नागरिकांना किंचित दिलासा मिळाला आहे. त्यामळे मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये २५ टक्क्यांनी घट झाली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात कोरोनाचे १६९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०८७७५४ एवढी झाली आहे. त्यामळे बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे एकूण ७६७१ रुग्ण असून रुग्ण दुपटीचा दर ५८४ दिवसांवर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबई शहरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये २५ टक्क्यांनी घट झाली आहे.

जुलैच्या सुरुवातीलाच कोरोनाचे रुग्ण १० हजारांच्या खाली आले आहेत.मुंबईत जूनमध्ये कोविडबाधितांमध्ये वाढ झाली.परंतु, महिनाअखेरीस सक्रिय रुग्णांमध्ये २५ टक्के घट झाली. १ जून रोजी मुंबईत २,९७० सक्रिय रुग्णांची नोंद झाली.त्याच दिवशी ७३९ नवीन बाधित नोंदवले गेले.त्यापैकी १०२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.जूनच्या मध्यापर्यंत शहरात दररोज दोन हजारांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. सक्रिय रुग्णांमध्ये चारपट वाढ झाली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT