Save the Tiger Campaign  Saam tv
मुंबई/पुणे

Save the Tiger Campaign : 'सेव्ह द टायगर' मोहिमेला मिस वर्ल्ड टीमचा पाठिंबा

sudhir mungantiwar News : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ ते ३ मार्च दरम्यान जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे 'ताडोबा फेस्टिव्हल'चे आयोजन करीत असल्याची घोषणा केली.

साम टिव्ही

sudhir mungantiwar News :

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ ते ३ मार्च दरम्यान वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे 'ताडोबा फेस्टिव्हल'चे आयोजन करीत असल्याची घोषणा एका कार्यक्रमात केली. यावेळी ७१ व्या मिस वर्ल्डच्या टीमने राज्य सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला समर्थन जाहीर केलं. (Lateset Marathi News)

सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हलचं आयोजन केलं. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आमंत्रण देण्यात आलंय.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'वाघांची संख्या २०१६ मध्ये ३८९० होती. त्यानंतर २०२३ मध्ये ५५७५ वर पोहोचली. त्यातही भारत आणि नेपाळ दुप्पट आकड्यांसह आघाडीवर आहेत. तसेच मिस वर्ल्ड टीमचं आदरातिथ्य करणे आणि वाघांच्या संरक्षणाचे यश जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे वाटते. त्यामुळे अनेक पिढ्यांपर्यंत वाघ जंगलात राहू शकतील'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जूलिया मॉरली काय म्हणाल्या?

मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ जूलिया मॉरली म्हणाल्या, 'आम्ही स्वतः सकारात्मक बदलाचे अ‍ॅम्बेसेडर असल्यामुळे आम्हाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं. याचा आम्हाला अभिमान वाटतोय. वाघ म्हणजे फक्त सौंदर्य आणि ताकदीचे प्रतीक नव्हे. त्यांचं पृथ्वीतलावर पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी विशेष महत्त्व आहे. प्राण्यांना स्थिर भविष्य देणीसाठी करण्यात येणारे प्रयत्न पाहून आम्हाला आनंद झाला आहे'.

‘ताडोबा फेस्टिव्हल’चे आयोजनाचा उद्देश काय?

या अभियानाच्या माध्यामतातून अवैध शिकार करणे आणि मनुष्य आणि वन्य जीवनातील संघर्ष यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. वाघांच्या संख्येत यशस्वीरित्या झालेली वाढ झाल्याचं प्रशासनाचा दावा आहे. हे यश साजरे करण्यासाठी ‘ताडोबा फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल

Bus Accident News : प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू; ११ प्रवासी गंभीर जखमी

Urine Infection : पावसाळ्यात रोज 'हे' सुपरफूड खा; बाजारात सहज मिळेल, युरिन इन्फेक्शनपासून वाचाल

श्रावणासाठी परफेक्ट रेसिपी, घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बटाट्याचे पौष्टिक लाडू,

Super Obesity: 209 किलो वजन, श्वास घेणंही अवघड; डॉक्टरांनी 32 दिवसांत असा केला चमत्कार, रुग्णाला मिळालं नवं आयुष्य

SCROLL FOR NEXT