Fraud Alert news  saam tv
मुंबई/पुणे

Fraud Alert: पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी मेसेज आलाय, सावधान! वृद्धाची लाखोची फसवणूक

वृद्ध नागरिकाची एक लाख 37 हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Crime News : बँक खात्याशी पॅन कार्ड अपडेटचा बहाना करून एका 64 वर्षीय वृद्ध नागरिकाची एक लाख 37 हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रेम कौशल असं फसवणूक झालेल्या वृद्ध नागरिकाचे नाव आहे. प्रेम हे वांद्रे पश्चिम परिसरात राहणारे आहेत.

फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्याने प्रेम कौशल यांनी तात्काळ सांताक्रुज पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गोल्डन अव्हर्समध्ये फसवणूक झालेली रक्कम फ्रीज करून फिर्यादी वृद्ध नागरिकाला दिलासा दिला. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे पश्चिमेकडे राहणारे प्रेम कौशल काही कामानिमित्त अंधेरी पश्चिमेकडील आंबोली परिसरात आले होते. त्यावेळी त्यांना एचडीएफसी बँकेच्या नावाने मोबाईलवर एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये त्यांना बँक (Bank) खात्याशी आपले पॅन कार्ड (Pan Card) अपडेट करा असा मजकूर लिहिण्यात आला होता.

या मेसेजला रिप्लाय देताना त्यांनी आपल्या बँक खात्याची संपूर्ण अपडेट दिल्यानंतर त्यांच्या खात्यातील एक लाख 37 हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज प्रेम कौशल यांना आला.

कौशल यांना ते घरी परतत असताना रस्त्यातच सांताक्रुज पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली. यानुसार सांताक्रुज पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तात्काळ तपासाला सुरुवात केली.

सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काने, व पोनि. हिबारे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पो. उपनि. राहुल कोकाटे, पो.शि. प्रविण सुरवसे यांनी तात्काळ एचडीएफसी बँक, पे यू व क्रोमा या कंपनीच्या नोडल अधिकारी यांना ईमेल करून तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम थांबविण्यासाठी विनंती केली.

त्यानंतर फिर्यादी प्रेम कौशल यांची फसवणूक झालेल्या रकमेपैकी एक लाख 37 हजार 592 रुपये ही पूर्ण रक्कम त्यांच्या एचडीएफसी या बँक खात्यात परत मिळाल्याने फिर्यादी यांनी सांताक्रुज पोलिसांना कळवले. पोलिसांच्या (Police) या तत्परतेमुळेच फसवणूक झालेली पूर्ण रक्कम पुन्हा मिळाल्याची भावना फिर्यादी यांनी व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT