Mobile Snatching In Malad: Saam Tv
मुंबई/पुणे

Malad: मोबाईल हिसकावताना चोरट्यानं दिला धक्का; ६१ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Mobile Snatching In Malad: मालाडच्या मार्वे रोड, लुडस काॅलनी येथे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मोबाईल चोरांनी मोबाईल हिसकावताना दिलेल्या धक्क्यात ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालाडच्या (Malad) मार्वे रोड, लुडस काॅलनी येथे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुकेश विक्रमदास भाटिया या ६२ वर्षी वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ( 61-year-old man died after being hit by a thief while snatching his mobile phone In Malad)

हे देखील पहा -

लुडस काॅलनी येथील एसव्हीसी बॅकेजवळून भाटीया हे जात असताना अचानाक आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून (Mobile Snatching In Malad) चोरांनी त्यांना ढकलून दिले. या धक्काबुक्कीत भाटीया खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. भाटिया यांना तातडीने शताब्दी रुग्णालय उपचारासाठी नेले. उपचारा दरम्यान भाटीया यांचा मृत्यू (Death) झाला.

या घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिस घटनास्थळी पोहचले. तपासाची चक्र फिरली आणि अवघ्या काहीतासात पोलिसांनी शारीक युनिस अन्सारी या आरोपीला अटक केली आहे, तर आसिफ शेख आणि आमीर या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी भाटिया यांच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT