RPF च्या जवानांमुळे ६ महिन्यांच्या चिमुकलीची झाली पालकांशी भेट! जयश्री मोरे
मुंबई/पुणे

RPF च्या जवानांमुळे ६ महिन्यांच्या चिमुकलीची झाली पालकांशी भेट!

पोलिसांनी व्यवस्थित चौकशी व शहानिशा करून या चिमुकलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवले.

जयश्री मोरे

मुंबई : मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस आलेल्या गाडी नंबर 02168 वाराणसी ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेत एस-1 बोगीत 5 ते 6 महिने वय असलेली एक चिमुकली आढळून आली. कल्याण स्टेशन वरून हि ट्रेन निघाल्यावर वरच्या बर्थ वर एक बाळ रडत असल्याचे प्रवाश्यांच्या निदर्शनास आले.

हे देखील पहा -

त्यांनी याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने ही माहिती एलटीटी च्या आरपीएफ RPF पोलिसांना दिली. ही ट्रेन एलटीटीला आल्यावर कर्मचाऱ्यांनी या मुलीला ताब्यात घेऊन त्यांनी तिला कार्यालयात आणले. यावर पुढील कार्यवाही करत लहान मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांना RPF च्या जवानांनी बोलवले.

रेल्वे सुरक्षबल या मुलीच्या मातापित्याचा शोध घेत असतानाच या चिमुकलीचे नातेवाईक पाठीमागून येणाऱ्या रेल्वेने RPF स्थानकात पोहचले. पोलिसांनी व्यवस्थित चौकशी व शहानिशा करून या चिमुकलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवले.

मिळालेल्या माहितीनुसार या चिमुकलीच्या जन्मानंतर तिच्या आईच निधन झाले असून. सध्या तिचे आजोबा तिचा सांभाळ करतात. तिचे आजोबा उत्तरप्रदेश मधील जोनपूर येथील मूळचे रहिवासी असून उल्हासनगर येथे काम करतात.

सोबत असलेल्या वृद्ध महिलेला उतरावल्यानंतर रेल्वे सुरू झाली. त्यामुळे मुलगी रेल्वेतच राहिली होती. अशी माहिती या मुलीच्या आजोबांनी दिली. तर आपले सामान आणि लहान मुलांकडे लक्ष ठेवा अस आवाहन आरपीएफ च्या वतीने प्रवाशांना करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT