pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Koyta Gang Crime: कोयता गँगची दहशत कायम, ६ जणांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

खेडमध्ये कोयता गँगकडून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घडली आहे.

रोहिदास गाडगे

Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन करून देखील कोयता गँगची दहशत कमी होत नाही. कोयता गँगचा पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेडमध्ये कोयता गँगने एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) खेड तालुक्यातील चांदुस येथे 6 जणांनी जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने तोंडावर सपासप वार करत तरुणाची निघृण हत्या केली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास शुभम काळे नावाच्या तरुणाची निघृण हत्या झाल्याची घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चांदुस येथील माळरानालगत शुभमला अडवून तोंडावर,हात,पाठीवर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला स्थानिक तरुणांनी उपचारासाठी राजगुरुनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारामुळे खेड तालुक्यातील ग्रामीण भागातही कोयता गँग सक्रिय झालीय का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

आधारकार्डवर मिळणार कोयता

शहरात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घटनांमध्ये कोयत्याचा वापर दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सध्या शहरात कोयता खरेदीसाठी आधार कार्डवर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यात कोयता कुणी विकत घेतला याची माहिती पोलिसांना मिळणार असल्याने हा निर्णय घेतला. कोयता गँगने दहशत माजवल्याने निर्णय घेतला होता. मात्र, तरीही खेड तालुक्यात कोयता गँगने धक्कादायक प्रकार केला आहे. यामुळे पोलिसांकडून (Police) कोम्बिंग ऑपरेशन करून देखील कोयता गँगची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT