Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: कल्याणमध्ये मद्यपींचा धिंगाणा, शिविगाळ करत 5 ते 6 गाड्यांची केली तोडफोड!

Latest Crime News: कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात मद्यपींनी रस्त्यावर धिंगाणा करुन वाहनांची तोडफोड केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kalyan News: कल्याणमध्ये (Kalyan) मद्यपींच्या राड्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहे. रस्त्यामध्ये दारु पिऊन धिंगाणे करणे, लोकांना त्रास देण्याचे प्रकार अजूनही सुरुच आहेत. अशामध्ये कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात मद्यपींनी रस्त्यावर धिंगाणा करुन वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी (Kolasewadi Police) आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. याठिकाणी मद्यपी तरुणांनी भर रस्त्यात शिविगाळ करत 5 ते 6 गाड्यांची तोडफोड केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मद्यपींनी महागड्या चारचाकी गाड्या, रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड केली आहे. यामुळे गाडी चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. गाड्यांची तोडफोड का करण्यात आली याचे कारण समजू शकले नाही.

कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी जयेश डोईफोडे उर्फ टक्या याच्यासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जयेश डोईफोडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरु आहे. जयेश डोईफोडे याच्या टोळीकडून सतत धिंगाणा सुरु असतो त्यामुळे कोळसेवाडी परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात पाय ठेवू नये- आमदार उत्तम जानकर यांचा इशारा

Konkan Politics: कोकणात भाजपला हादरा, कणकवलीच्या नगराध्यपदी पारकर

Shubman Gill: शुभमन गिलच्या नावावर का बसली कात्री? रिपोर्टमधून सत्य कारण अखेर समोर

बांगलादेश पुन्हा पेटलं; जमावाने नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा होरपळून मृत्यू

Hair Care: केस ड्राय होऊन गळतायतं? मग पार्लर ट्रिंटमेंटपेक्षा घरीचं करा 'हा' हेअस मास्क, एका वॉशमध्येच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT