mumbai crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: ४७ वर्षीय महिलेने १८ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन; नातेवाईकांकडे चहा पिण्यासाठी गेल्या अन्...

mumbai news: मुंबईच्या भांडुप येथील टेंभीपाड्याजवळ ४७ वर्षीय महिलेने १८ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड

Mumbai News: मुंबईतून धक्कादायक वृत्ता हाती आलं आहे. मुंबईच्या भांडुप येथील टेंभीपाड्याजवळ ४७ वर्षीय महिलेने १८ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपच्या टेंभीपाडा येथील ४७ वर्षीय रीना सोळंकी नावाच्या महिलेने नातेवाईकांच्या घरातून उडी मारून जीवन संपवलं आहे. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

महिलेने आजारपणाला कंटाळून जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भांडुप पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली आहे.

आजारामुळे होत्या नैराश्यात

भांडूपमधील त्रिवेणी संगम हरिजन इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

रीना या आजारपणामुळे नैराश्यात होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्या मुंबई महापालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होत्या.

नेमकं काय घडलं?

४७ वर्षीय रीना या आजारपणामुळे नैराश्यात होत्या. आज सकाळी रीना या त्रिवेणी संगम हरिजन इमारतीमधील त्यांच्या नातेवाईकांकडे गेल्या. रीना या सकाळी नातेवाईकांकडे चहा पिण्याच्या निमित्ताने गेल्या.

चहा पिण्यासाठी आलेल्या रीना यांनी अचानक नातेवाईकांच्या अठराव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर त्यांचा मृतदेह हा सहाव्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या जागेत सापडला. रीना यांच्या मृत्यूसंबंधी त्यांच्या कुटुंबीयांनाी कोणताही संशय व्यक्त केला नाही. त्यानंतर भांडुप पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. (Latest Mumbai News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT