Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : धक्कादायक! १८व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Mumbai Jogeshwari News : जोगेश्वरी पूर्वेतील Satra Nexus प्रकल्पात सुरक्षा उपायांचा घोर अभाव असल्यामुळे ४७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला असून नागरिकांनी विकासकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत Satra Nexus साइटवर कामगाराचा १८व्या मजल्यावरून पडून मृत्यू

  • प्राथमिक तपासात सर्व सुरक्षा उपायांचा पूर्ण अभाव स्पष्ट

  • विकासकांवर फौजदारी कारवाईची शक्यता

  • भरपाईची मागणी

संजय गडदे, मुंबई

जोगेश्वरी पूर्वेतील Satra Nexus या बांधकाम प्रकल्पात आज गंभीर दुर्लक्षामुळे आणखी एक जीव गेला. ४७ वर्षीय कामगार अन्मेष विश्वास हे १८व्या मजल्यावरून खाली पडून जागीच मृत्यूमुखी पडले. फॉल प्रोटेक्शन, सेफ्टी नेट्स, हेल्मेट किंवा कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या परिसरात गेल्या काही वर्षांत अशाच निष्काळजीपणामुळे अपघाती मृतांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. संस्कृती अमिन (श्रद्धा कन्स्ट्रक्शन), शमा व आयत शेख (AIM Paradise) तसेच देवभूमी कन्स्ट्रक्शन साइटवरील कामगारांचा मृत्यू. या सर्व घटनांमध्ये एकच समस्या अधोरेखित केली जात आहे, ती म्हणजे सुरक्षा उपायांचा ठोस अभाव.

तज्ज्ञांचे मत आहे की जोगेश्वरी परिसरातील बांधकाम साइट्सवर सुरक्षा नियम केवळ कागदापुरते राहिले असून, हा "सिस्टिमॅटिक नेग्लिजन्स" तातडीने रोखण्याची गरज आहे. या प्रकरणात BOCW Act, BOCW Cess Act आणि Employees Compensation Act अंतर्गत विकासक कायदेशीरदृष्ट्या जबाबदार ठरत असून, सुरक्षा उपाय जाणूनबुजून न पुरवणे हे भारतीय न्याय संहिता कलम १०६ अंतर्गत फौजदारी गुन्ह्यात मोडते.

उंच इमारतींच्या कामादरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर सेफ्टी शेड्स व नेट्स अनिवार्य असतानाही, Satra Nexus साइटवर ते नसल्याने मृत्यूची थेट जबाबदारी विकासकावर आल्याचे मानले जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिक व कामगार संघटनांनी या विकासकावर परवाना निलंबन, दंड, ब्लॅकलिस्टिंग आणि मृताच्या कुटुंबाला तात्काळ भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack in Women: 70% महिलांकडून हार्ट अटॅकची 'ही' लक्षणं दुर्लक्षित; अचानक जाणवणारा थकवा असू शकतो मोठा रेड फ्लॅग

Eyebrow Tips : १ हफ्त्यात पातळ आयब्रो करा घनदाट आणि जाड ; घरच्या घरी बनवा हे सीरम

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील दरोड्याचे बीड कनेक्शन उघड; पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: अशोक खरातच्या जामिनाला सरकारचा विरोध; ६ लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांची सेशन्स कोर्टात सुनावणी

SCROLL FOR NEXT