4 year old baby dies due to electric shock incident in Nagpur city Saam TV
मुंबई/पुणे

Nagpur News: आई घरकामात व्यस्त, ४ वर्षीय चिमुकला टीव्हीजवळ गेला अन् अनर्थ घडला; मन सुन्न करणारी घटना

Nagpur 4 year Old Baby Death News: टीव्हीवर कार्टून बघत असताना चिमुकल्याने अचानक सेटटॉप बॉक्स खाली ओढला. त्याचवेळी त्याला विजेचा धक्का जोरदार धक्का बसला.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur 4 year Old Baby Death News: टीव्हीवर कार्टून बघत असताना चिमुकल्याने अचानक सेटटॉप बॉक्स खाली ओढला. त्याचवेळी त्याला विजेचा धक्का जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तपासणी करत मृत घोषित केलं.

अंगावर काटा आणणारी ही घटना नागपूर शहरातील (Nagpur News) हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रियांशू असं मृत्युमुखी पडलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास प्रियांशूचे बाबा कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्याची आई घरकामात व्यस्त होती. प्रियांशूचं मनोरंजन व्हावं, यासाठी आईने हॉलमध्ये टीव्ही लावला होता.

या टीव्हीवर कार्टून सुरू होतं. मात्र, खेळता-खेळता प्रियांशू टीव्हीकडे गेला. त्याने टीव्हीवर ठेवलेलं सेटटॉप बॉक्स खाली खेचलं. त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे प्रियांशू बेशुद्ध होऊन खाली कोसळला.

दरम्यान, प्रियांशूची आईने तातडीने त्याला घेत रुग्णालयात धाव घेतली. मात्र, डॉक्टरांनी त्याची तपासणी करत त्याला मृत घोषित केलं. आपल्या नजरेसमोर चिमुकल्या प्रियांशूचा जीव गेल्याचं पाहून आईने हंबरडा फोडला. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT