33 years old woman ends life after her husband calls her fat Saam Tv
मुंबई/पुणे

Byculla Latest News : नवरा सारखा जाडी बोलायचा; रागाच्या भरात बायकोने जीवन संपवलं

Mumbai Byculla Latest News : मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने 'जाड' म्हटल्याने बायकाने रागाच्या भरात जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईतील भायखळ्यात ही घटना घडली.

Vishal Gangurde

Mumbai Byculla Latest News :

मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने 'जाड' म्हटल्याने बायकाने रागाच्या भरात जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईतील भायखळ्यात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेच्या मृत्यूप्रकरणी महिलेच्या पती आणि बहिणीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, भायखळ्यात ३३ वर्षीय तेहमिना अस्लम कांदे या महिलेने तिच्या आईच्या घरी १४ फेब्रुवारीला जीवन संपवल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहमिनाचा नवरा अस्लमने मूल होत नसल्याच्या कारणावरून तिच्यासोबत संबंध तोडून दुसरे लग्न केले होते. यामुळे तेहमिना गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होती'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम आणि तेहमिना या दोघांचं १७ जानेवारी २०१६ साली लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर तेहमिनाचं किरकोळ कारणावरून अस्लम आई-वडिलांशी रोज भांडण व्हायचं. पुढे अस्लम आणि तेहमिना यांच्यातही रोज भांडण होऊ लागले. तेहमिनाची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही, त्यामुळे ती किरकोळ गोष्टीवरून भांडण करायची, असा अस्लमचा दावा होता. भांडण वाढल्याने अस्लमने तेहमिनाला तिच्या माहेरी सोडलं होतं.

तेहमिनाच्या आईने काय सांगितलं?

तेहमिनाच्या आईने पुढे सांगितलं की, 'तेहमिनाने सांगायची की, अस्लम मारहाणही करायचा. कुठे फिरायलाही घेऊन जात नाही. वैयक्तिक खर्चालाही फार कमी पैसे द्यायचा'. काही दिवसांनंतर तेहमिना पुन्हा सासरी गेली होती.

त्यानंतर तेहमिनाच्या आईने आरोप केला आहे की,'तेहमिनाने घरी गेल्यानंतरही पुन्हा भांडण सुरु केल्याचं सांगितलं होतं. तेहमिनाला अस्लमचं विवाह्यबाह्य संबंध असल्याचा संशय होता. तो तेहमिनाचे कपडेही वेगळा ठेवायचं. तिला सोशल मीडिया वापरण्यासही मज्जाव करायचा. ती भाजी घेण्यासाठीही बाजारातही गेल्यावरही तिच्यावर लक्ष ठेवायचा'.

अस्लमच्या नवऱ्याने तेहमिनाला काय म्हटलं होतं, 'तू जाड आहे. तू दिसायला सूंदर नाही. तुला कपडेही व्यवस्थित घालण्याचा सेन्स नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT