दुर्दैवी : कोळसा उतरवताना कंटनेर झोपडीवरती कोसळल्याने 3 मुलींचा झोपेतच मृत्यू
दुर्दैवी : कोळसा उतरवताना कंटनेर झोपडीवरती कोसळल्याने 3 मुलींचा झोपेतच मृत्यू Saam TV
मुंबई/पुणे

दुर्दैवी : कोळसा उतरवताना कंटनेर झोपडीवरती कोसळल्याने 3 मुलींचा झोपेतच मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील टेंभिवली गावात वीटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनरमधून खाली करत असतांना कंटेनरचा सोकप अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर वीटभट्टी मजुरांच्या झोपडीवरती कोसळला आणि संपुर्ण कोळसा (Coal) घरावर पडल्याने घरात राहणारी सर्व सदस्य गाडले गेले. घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना लागताच स्थानिकांनी कोळश्याच्या ढिगा-याखालुन सर्वांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत तीन मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बालाराम वळवी हे आपल्या गवताच्या घरात (झोपडीत) आपल्या कुटुंबासह झोपेत असताना त्यांच्या घराशेजारी वीट भट्टीसाठी लागणारा कोळसा खाली केला जात होता. मात्र यासाठी वळवी यांनी अनेक वेळा विरोध केला होता परंतु विरोध करूनही हा कोळसा घराशेजारीच उतरवला जात होता आणि अचानक ह्या कंटेनर चा सोकप तुटल्याने अपघात होऊन कोळसा थेट घरावर पडला आणि या दुर्घटनेत वळवी कुटुंब अक्षरशः कोळशाखाली गाडले गेले.

हे देखील पहा -

या दुर्घटनेत वळवी व त्यांची पत्नी व एक लहान चिमुकल्या बाहेर काढण्यात स्थानिकांना यश परंतु इतर तीन मुली कोळशाच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने कोळसा हटवत त्यांना बाहेर काढले प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरता भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital Bhiwandi) पाठवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या दुर्घटनेमध्ये वळवी यांची तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . तर दुसरीकडे संतप्त जमावाने कंटेनर (ट्रकची) ची तोडफोड केली आहे सध्या भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला सध्या पोलिसांनी अटक केली आहे तर वीटभट्टी मालक ,ट्रक मालक त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे व पुढील तपास भिवंडी तालुका पोलिस करीत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray Demands: मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे अन् बरंच काही; भरसभेत राज ठाकरेंच्या PM मोदींकडे या महत्त्वाच्या मागण्या

Today's Marathi News Live: दिल्लीत हरवता येत नाही म्हणू माझ्या अटकेचं कारस्थान, अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप

PM Modi Speech: काँग्रेसने देशाची ५ दशकं वाया घालवली; शिवाजी पार्कातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Maharashtra Politics 2024 : इंडिया आघाडीतील कोणाला पडतायेत पंतप्रधानपदाची स्वप्न?; एकनाथ शिंदेंनी नाव घेत शिवतीर्थावरून केली सडकून टीका

Raj Thackeray: आधी कौतुक, मग सल्ले, नंतर थेट मागणीच केली; भरसभेत PM मोदींसमोर काय म्हणाले राज ठाकरे?

SCROLL FOR NEXT