Mumbai Crime News Yandex
मुंबई/पुणे

Mumbai Crime : घराच्या मागच्या दरवाजातून शिरून गर्लफ्रेंडसोबत केलं भयानक कांड, गुन्हा कबुल करताच बापाने मुलाला पोलिसांत नेलं

boyfriend kills girlfriend : घराच्या मागच्या दरवाजातून शिरून गर्लफ्रेंडसोबत केलं भयानक कांड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने गुन्हा कबुल करताच बापाने त्याला पोलिसांत नेलं.

Vishal Gangurde

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. पुढे स्मशानात जाऊन आईच्या कबरीजवळ जाऊन बसला. वडिलांनी या तरुणाला शोधले. आरोपीने तरुणाने वडिलांसमोर गुन्हा कबुल केला. त्यानंतर त्यांनी मुलाला पोलिसांत हजर केले.

काय आहे नेमकं प्रकरण?

२२ वर्षीय तरुण त्याच्या १८ वर्षीय प्रेयसीच्या अंधेरीतील मरोळ येथील घरात रात्री मागच्या दरवाजातून बेडरुममध्ये शिरला. त्याने तरुणीची शनिवारी पहाटे ४.३० वाजता हत्या केली. त्याची प्रेयसी इयत्ता बारावीत होती. या प्रेयसीने प्रियकराला मागच्या दरवाजातून बेडरुममधून शिरायला संधी दिली. बेडरुममध्ये दोघांचं भांडण झालं. त्यानंतर या तरुणाने प्रेयसीची हत्या केली.

प्रेयसीचे वडील आणि भाऊ तिच्या बेडरुमजवळील रुममध्ये झोपले होते. बेडरुमचा दरवाजा बंद असल्याने मुलीचा प्रियकर घरात शिरल्याचं माहीत नव्हतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा बारावीनंतर मॅकेनिकचा कोर्स करत होता. त्याने भांडण झाल्यानंतर प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांसमोर कबुल केले.

या हत्येच्या घटनेनंतर अंधेरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर ही तरुणी राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांकडून आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी करत आहे.

सकाळी मुलीच्या वडील आणि भावाने ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषित केले. प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी तरुणाने घरातून पळ काढला. त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तो आत्महत्या करू शकला नाही. त्यानंतर स्मशानात जाऊन बसला.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघे एकमकेांना मागील तीन वर्षांपासून ओळखत होते. रविवारी सकाळी तिची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यामध्ये सोशल मीडियावर भांडण झाले होते. पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT