Badlapur kondeshwar Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur kondeshwar : मित्रांसोबत फिरायला गेला अन् घरी परतलाच नाही; बदलापूरमधील धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अजय दुधाणे

मुंबई : पाऊस सुरु झाल्यानंतर बहुतेक तरुणांची पावले धबधब्याच्या ठिकाणी वळू लागतात. अनेक जण त्यांच्या मित्रांसोबत धबधब्यावर जातात. मात्र, याच धबधब्यावर जाणे काही जणांच्या जीवावर बेतते. असाच प्रकार बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

साम टीव्हीने बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर जीवघेण्या स्टंटबाजीमुळे जीवीतहानी होण्याची शक्यता वर्तवली होती. साम टीव्हीने बुधवारी याबाबत शक्यता वर्तवली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीच बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनुप मिश्रा असे तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथून अनुप त्याच्या ४ मित्रासंह कोंडेश्वर येथे फिरण्यासाठी आला होता.त्याने कोंडेश्वरच्या महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर या पाच जणांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. कोपरखैरणे येथील सर्व तरुण पाण्यात उतरले.

पाण्यात उतरलेल्या तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही. या घटनेत अनुपचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. अनुप हा अतिशय गरीब कुटुंबातील तरुण आहे. कुटुंबीयांनी तरुण मुलगा गमावल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यात पोहण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोंडेश्वरला जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षी पावसाळा नीट सुरूही झाला नाही. त्याआधीच कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुंबईजवळील बदलापुरात असलेला कोंडेश्वर धबधबा हा राज्यात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या धबधब्यावर हजारो पर्यटक दरवर्षी येतात. या ठिकाणी असेलेलं कुंड पाण्याखाली जाते. कुंड पाण्याखाली अनेकांना त्याचा अंदाज येत नाही. याच कुंडात अडकून तरुणांचा जीव गेला आहे. त्यामुळे पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

SCROLL FOR NEXT