BMC Saam Tv
मुंबई/पुणे

महानगर पालिकांच्या निवडणुका तोंडावर, सत्ताधाऱ्यांनी लावला कामाचा धडाका

नदी शुध्दीकरण ,पाणी पुरवठा ,पर्जन्यवाहीन्यांच काम आणि कोविड संदर्भातील कामांसाठी मिळून तब्बल 2 हजार कोटी रुपयांचे १०० हुन अधिक प्रस्ताव चर्चेसाठी प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महानगर पालिकेच्या निवडणुका (Municipal Corporation Election) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या काही दिवसात सत्ताधारी शिवसेनेने (Shivsena) कामांचा धडाका लावला आहे. नदी शुध्दीकरण ,पाणी पुरवठा ,पर्जन्यवाहीन्यांच काम आणि कोविड (Corona) संदर्भातील कामांसाठी मिळून तब्बल 2 हजार कोटी रुपयांचे १०० हुन अधिक प्रस्ताव चर्चेसाठी प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. (Municipal Corporation elections Latest News)

या आठवड्यात प्रशासनाकडून ५६ प्रस्ताव मांडण्यात आला असून मागील आठवड्याची बैठक तहकूब झाल्याने त्यावेळचे सुमारे ५० प्रस्ताव प्रलंबीत आहेत. या आधी झालेल्या स्थायी समितीत २ हजार २०० रुपयांचे केवळ रस्त्यांसंदर्भातील प्रस्ताव पारित करण्यात आले होते, आणि त्यानंतर आता २ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर केले जाणार असल्यामुळे १५ दिवसात ४ हजार कोटींवर काम केली जाणार आहेत.

हे देखील पहा -

गेल्या २५ वर्षांपासून महानगर पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने २०१७ चा आपला वचननामा सादर करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आता कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात कामाचा धडाका लावून वचनपूर्ती करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. वचननाम्यातील नदी शुध्दीकरण ,पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर उपाय, चौक, वाहतुक बेटांचे सुशोभीकरासह ५०० चौरस फुटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. या नुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपुर्वीच मालमत्ता कर माफीच्या घोषणेवर शिक्कमोर्तब केले आहे. लवकरच तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल. तसेच उरलेल्या कामाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत आणून मार्गी लावण्याचा शिवसनेने धडाका लावला आहे .

डदहिसर नदीच्या शुद्धीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्या नंतर आता पोयसर नदीच्या शुध्दीकरणाचाही प्रस्ताव स्थायी समितीत येणार असून तयासाठी महानगर पालिका २ हजार ४२८ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे .

मुंबईत (Mumbai)पावसाळ्यातील दरवर्षीच्या पुरपरीस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगर पालिकेने तब्बल १०० कोटी रुपयांचे प्रस्ताव देखील येत्या स्थायी समितीच्या सभेत या वेळी मांडले आहेत. यात शहर विभागातील पर्जन्यवाहीन्यांची क्षमता वाढविणे , नव्या पर्जन्यवाहीन्या टाकण्या उभारणे अशी कामे करण्यात येणार आहे. तसेच हिंदमाता येथील पुरपरीस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दादर पुर्व येथील प्रमोद महाजन उद्यानात भुमिगत टाक्या बांधण्यात येत आहे. या कामा अंतर्गत दुसरी टाकी बांधण्यासाठी २७ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. हे तीन प्रस्ताव मिळून ९९ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

पश्‍चिम उपनगरातील पाणी पुरवठ्यात सुधारणासाठी जलवाहीन्या बदलणे ,नव्या जलवाहीन्या टाकण्या तसेच सिमेंटच्या रस्त्याखाली गेलेल्या वाहीन्यांचा मार्ग बदलण्यासाठी ७९ कोटी ९९ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Harishchandragad Fort : ६व्या शतकापासून इतिहास जपणारा हरिश्चंद्रगड, गुहेत दडलंय रहस्य! किल्ला तुम्ही पाहिलाय का?

Video : गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राचे रस्ते खराब; फडणवीस सरकारमधील मंत्रीच नाराज

Guava vs Apple: पेरू की सफरचंद? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

शिवसेना खासदाराच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, Video Viral

Maharashtra News Live Update: MIDC मध्ये उद्योग धंद्यांच्या वासा ऐवजी, कचऱ्याचा वास येतोय- आदित्य ठाकरे

SCROLL FOR NEXT