Pune crime news Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुणे हादरलं! अवघ्या 1500 रुपयांसाठी तरुणाने एकाला संपवलं

pune crime news: पुण्यात जुन्या मोबाईल हँडसेटचे दीड हजार रुपये न दिल्यामुळे गळ्यावर ब्लेडने वार करून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव

Pune Crime News: पुण्यातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. पुण्यात एकाला दीड हजार रुपये न देणे जीवावर बेतले आहे. पुण्यात जुन्या मोबाईल हँडसेटचे दीड हजार रुपये न दिल्यामुळे गळ्यावर ब्लेडने वार करून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. (Latest Marathi News)

अमरजीत जगन्नाथ गोयल (वय ५०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.या प्रकरणी पोलिस नाईक राहुल लहू कदम यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

राम श्रीमंत वाघमारे (वय २०) असे अटक केलेल्याचे नाव आहे.आरोपी राम वाघमारे याने अमरजीत गोयल याला जुना मोबाईल दिला होता. त्या मोबाइलचे दीड हजार रुपये न दिल्यामुळे शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला.

त्यावेळी वाघमारे याने अमरजीत याच्या गळ्यावर ब्लेडने वार करून डोक्यात मारहाण केली. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे अमरजीत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत.

किराणा दुकानदारांना लुटाणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

पुणे पोलिसांनी अनेक व्यावयिकांना गंडा घालणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. राज्यातील किराणा दुकानदारांना फसवणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला पुण्यात अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे.

सांगली, नागपूर, पिंपरी चिंचवड यासारख्या अनेक शहरात किराणा दुकानदारांकडून माल घेऊन पळून जाणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १ कोटी रुपयांपर्यंत राज्यातील अनेक व्यावसायिकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. या आरोपीने कोविड काळात संपूर्ण घोटाळा केल्याची माहितीही समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

Dahi Misal Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल दही मिसळ घरी कशी बनवाल? फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT