Woman 160kgs Falls Off Bed Saam TV
मुंबई/पुणे

Woman 160kgs Falls Off Bed: १६० किलो वजनाची रुग्ण महिला बेडवरून पडली; थेट आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना बोलावलं

Woman 160kgs Falls: आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने रुग्ण महिलेला सुखरूप पुन्हा बेडवर ठेवले.

Ruchika Jadhav

Thane News:

ठाण्यातील विजयनगरी गृहसंकुलात एक १६० किलो वजनाची रुग्ण महिला बेडवरुन खाली पडली आहे. ती पडल्यानंतर पुन्हा वरती ठेवण्यासाठी आणि बचावासाठी थेट आपत्ती व्यवस्थापनाला बोलावण्यात आलं. या घटनेची सध्या संपूर्ण रुग्णालयात चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरातील विजयनगरी गृहसंकुलात १६० किलो वजन असलेली रुग्ण महिला खाटेवरून खाली पडली. तिला पुन्हा वरती ठेवण्यासाठी चक्क ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने रुग्ण महिलेला सुखरूप पुन्हा बेडवर ठेवले.

सदर घटना गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. विजय नगरी एनेक्स इमारत क्रमांक १९, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे इमारतीच्या ६ व्या माळ्यावर राहणाऱ्या प्रसाद वर्तक यांच्या घरी ६२ वर्षीय छाया शंकर वर्तक या आजारी महीला राहतात. त्या रात्री झोपेमध्ये घरातील बेडवरून खाली लादीवरती पडल्या होत्या.

सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी १६० किलो वजन असणाऱ्या या महिलेला सुरक्षीत बेडवर पुन्हा ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT