Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात 16 वर्षीय मुलाचा खून, मृतदेह पोत्यात; आरोपी 26 वर्षीय

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, मृतदेह शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: कोथरुडमधील (Pune-Kothrud) एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेज मैदानाजवळ एका 16 वर्षीच्या मुलाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. करण गोपाळ राठोड (वय 16, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आता आरोपीचे माहिती समोर आली आहे. आरोपीतचे नाव पिंटू गौतम असून तो 26 वर्षीय आहे. खाऊचे आमिष दाखवून त्याला बाहेर नेले आणि खून केला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, मृतदेह शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एकलव्य कॉलेज मैदानाजवळ रात्रीच्या वेळेस लहान मुले खेळत होती. त्यांना पोत्यात काहीतरी बांधून ठेवलेले आढळून आले. पोते उघउून पाहिल्यावर त्यांना त्यात मृतदेह आढळून आला. त्यांनी आसपासच्या लोकांना सांगितले. तेथून ती बातमी पोलिसांना मिळाली. मृत मुलगा विशेष असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे आई वडील मजुरी करतात. मुलाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. म्हणून मुलावरती अत्याचारा झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. परंतु शवविच्छेदन अहवाल आल्यावरती सर्व समोर येईल. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT