सोळा वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

सोळा वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

मोबाईल दुकानात काम करणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाची एका इसमाने बंदुकीतून गोळी झाडून हत्या केल्याची घटना धक्कादायक घटना पिंपरी -चिंचवड मध्ये घडली आहे.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे : मोबाईल दुकानात काम करणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाची एका इसमाने बंदुकीतून गोळी झाडून हत्या केल्याची घटना धक्कादायक घटना पिंपरी - चिंचवड Pimpari Chinchwad  मध्ये घडली आहे. या घटनेत ओवेज इसाक इनामदार नामक मुलगा जागीच ठार झाला आहे. तर गोळी झाडणारा आरोपी किरण शिवाजी वासरेला पोलिसांनी अटक केली आहे. 

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी किरण स्वतःकडे बेकायदेशीर रित्या पिस्तुल बाळगायचा. घटनेच्या दिवशी म्हणजे काल रात्री तो ओवेज काम करत असलेल्या एक्सपर्ट मोबाईल दुकानात आला तेव्हाही त्याच्याकडे पिस्तुल होती. ती पिस्तुल बघून ओवेज ने त्याला पिस्तुल का घेऊन आला अस विचारलं आणि बेकायदेशीर रित्या पिस्तुल बाळगणं गैर असल्याच सांगितले.

मात्र आरोपी किरणला ओवेजचा राग आला आणि त्याने ओवेज वर चक्क गोळी झाडून हत्या केली आहे. आरोपी किरण कडे असलेल्या विनापरवाना पिस्टल बाबत तो पोलिसांकडे आपली तक्रार करेल या भीतीमुळेही किरण ने ओवेज वर गोळी झाडली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.  सध्या वाकड पोलीस या घटनेचा तपास करत असून आरोपी किरण वापरत असलेली बंदूक त्याने कुठून आणली, किरण आणि ओवेज मध्ये आधी काही वाद होते का? आरोपी किरणने पिस्तूलाचा धाक दाखवून  या आधी काही गुन्हे केले का याचा शोध घेत आहेत. 

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

SCROLL FOR NEXT