Govt. Job Vacancy Saam Digital
मुंबई/पुणे

Govt. Job Vacancy: 1.50 लाख तरुणांच्या हाताला मिळणार काम, कुठे मिळेल माहिती? कुठे कराल नोंदणी? जाणून घ्या

Job Vacancy News: ठाणे जिल्ह्यामध्ये शासनातर्फे कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा होणार आहे. यामध्ये तब्बल एक लाख ५० हजार बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आहे.

Sandeep Gawade

Job Vacancy

शिक्षण आहे, पण नोकरी नाही, नोकरी आहे पण मनासारखी नाही, काहींना स्वयंरोजगाराच्या वाटेवर जायचे आहे, मात्र भांडवल नाही. या चिंतेत अडकलेल्या ठाणे जिल्ह्यातील बेरोजगारांना ‘नमो’ संधी चालून आली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये शासनातर्फे कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा होणार आहे. यामध्ये तब्बल एक लाख ५० हजार बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आहे. अगदी आठवी उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांपर्यंत सर्वांसाठी या मेळाव्यात रोजगाराची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्यांना स्वयंरोजगार करण्याची इच्छा आहे, त्यांनाही यावेळी मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.

दिवसेंदिवस महागाईचा फेरा घट्ट होत चालला आहे. त्यात बेरोजगारीची भर पडत आहे. घरातील तरुण मुलांना नोकरी मिळत नसल्याने पालकही चिंतेत सापडले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने दाखवलेले रोजगार निर्मितीचे स्वप्न हवेत विरले आहे. यासर्वांचा परिणाम आगामी निवडणुकांवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीआधी राज्यात मोठ्या प्रमाणात शासनातर्फे रोजगार मेळाव्यांचे आयोजन होत आहे; मात्र यामागे हेतू कोणताही असला तरी होतकरू तरुणांना काम देण्याची संधी यानिमित्ताने चालून आली आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात कोकण विभागिय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन २४ आणि २५ फेब्रुवारीला ठाणे शहरातील माजिवाडा, ढोकाळी येथील हायलँड मैदनात होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत या नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी आतापर्यंत १३ अस्थापनांमार्फत २ हजार ६०३ पदांची अधिसुची आली आहे. शासकीय विभागांनी विविध कंपन्यांशी संपर्क साधून रिक्त पदांची यादीही मागवल्या आहेत. हा मेळावा कोकण विभागीय असल्याने केवळ ठाण्यातच नव्हे तर मुंबईसह कोकणपट्ट्यातील शेकडो कंपन्यांत जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली. वास्तविक हा मेळावा १७ व १८ फेबुवारीला होणार होता. मात्र जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मेळावा पाच दिवस पुढे ढकलण्यात आला.

मदतीसाठी हेल्पलाईन

नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना आणि रोजगाराची संधी देणार्‍या अस्थापना, कंपन्यांना शासनाच्या https;//rojgar.mahaswayam.gov.in वेब पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. याबाबत अडचण आल्यास मदतीसाठी १८००१२०८०४० ही हेल्पलाईन देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात पोलिसावरच कोयत्याने हल्ला, ड्युटीवर जाताना गुंडांनी साधला डाव | VIDEO

Gondia : तीन मित्रांचा करुण अंत; शेत तळ्यामध्ये पोहायला गेले असता बुडून मृत्यू

Kalyan Crime : दाल-वड्याला उशीर, कल्याणमध्ये भाईचा इगो हर्ट! लंकेने हॉटेल मालकाला बेदम मारलं अन्...

Maharashtra Live News Update : शेत-तळ्यामध्ये बुडून तीन तरुणांचा मृत्यू, गोंदियातील घटना

SSKTK OTT Release : तुझे लागे ना नजरिया; वरुण-जान्हवीचा रोमँटिक ड्रामा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

SCROLL FOR NEXT