Naigaon Heartbreaking Saam tv
मुंबई/पुणे

Naigaon Heartbreaking : बॅडमिंटन खेळताना विजेचा शॉक लागला; १०वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Naigaon Heartbreaking News : नायगावमध्ये सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळताना १५ वर्षीय विद्यार्थ्याचा एसीच्या विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस तपास सुरु आहे.

Alisha Khedekar

नायगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नायगावातील बीच कॉम्प्लेक्स या सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत असताना विजेचा शॉक लागून १५ वर्षीय आकाश संतोष साहू या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यादुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी संद्याकाळी सातच्या सुमारास घडली असून या घटनेने साहू कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आकाश त्याच्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत होता. खेळत असताना शटल कॉक पहिल्या मजल्याच्या एका फ्लॅटजवळील खिडकीत गेला. अडकलेला शटल कॉक काढण्यासाठी आकाश पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटजवळ गेला. तिथल्या खिडकीतून एसीच्या विद्युतप्रवाहाचा जोरदार शॉक लागून आकाश जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

संबंधित फ्लॅटमध्ये राहणारी महिला ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले. या अपघातानंतर सोसायटीतील नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे. त्या महिलेबद्दल रहिवाशांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून अनेकदा तिला सोसायटीतून बाहेर काढण्यासाची मागणी देखील केली आहे.

घटनेचा संपूर्ण तपशील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. एसीमधून बाहेर पडणारा विद्युतप्रवाह इतका तीव्र कसा झाला? आणि त्यामागे कारण काय ? याबाबत चौकशी केली जात आहे. मात्र या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

SCROLL FOR NEXT