14 year old girl physical abuse in running taxi in mumbai latest crime updates Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: आधी अपहरण, नंतर धावत्या टॅक्सीमध्ये अत्याचार; मुंबईत १४ वर्षीय मुलीसोबत नराधमांचं भयानक कृत्य

Mumbai Crime News: आरोपींनी अल्पवयीन मुलीचे दादर येथून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार केला.

Satish Daud

Mumbai Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. पोलीस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

धावत्या टॅक्सीमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे दादर येथून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार केला. अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला मालवणीला सोडून दिले.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी (Police) आरोपींवर बलात्कार आणि बाल लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक देखील केली आहे.

सलमान शेख आणि टॅक्सी चालक प्रकाश पांडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची (Crime News) नावे आहेत. टॅक्सी चालकावर सलमानला मदत केल्याचा आरोप आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं

गेल्या ८ महिन्यात राज्यात महिला-तरुणींचा विनयभंग, अत्याचार तसेच अश्लील वर्तनाच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत ८ महिन्यात महिला अत्याचारासंबधित तब्बल १२५४ घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण चारपटीने जास्त आहे. मुंबईनंतर दुसरा क्रमांक पुणे शहराचा आहे. पुण्यात गेल्या ८ महिन्यांत विनयभंग/अश्लील वर्तनाच्या ३६४ घटना घडल्या आहेत. यामध्ये १२४ घटना बलात्काराच्या असून तसे गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

महिला अत्याचाराच्या घटनेत तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून गेल्या ८ महिन्यांत नागपुरात ३०४ महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.  शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे. 

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratalyachi Kheer Recipe: सुट्टीच्या दिवशी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी रताळ्याची खीर

Mumbai Crime : धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये ट्रान्सजेंडरने नको ते केले, तरुणीच्या अंगाला स्पर्श केला अन्....

Benefits of Good Sleep: कोणत्या वयोगटातील व्यक्तींना किती तासांच्या झोपेची गरज असते? न्यूरोलॉजिस्टने सांगितली परफेक्ट स्लीप गाईड

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

SCROLL FOR NEXT